Tuesday, September 17, 2024

मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही

Share

मुंबई : शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी ३-४ चेहरे आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे. ते शुक्रवारी टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीचा भरपूर समाचार घेतला.
 
“उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची एक नैसर्गिक यूती होती. आमची हिंदूत्वाची मतं एकत्रित राहिल्यामुळे त्याचा फायदा व्हायचा आहे. उद्धवजी तिकडे गेल्यामुळे ते काही ना काही आमचीही मतं घेऊन गेलेत. हळूहळू ती मतं वापसही यायला लागली आहेत. ज्या राजकारणाला बाळासाहेबांनी पूर्णपणे विरोध केला ते लांगूलचालनाचे राजकारण उद्धवजींनी स्विकारले.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, “काँग्रेसने तयार केलेला सर्वे हा उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी तीन दिवस दिल्लीत जाऊन बसले. परंतू, त्यांची ईच्छा पूर्ण झाली नाही. आमच्या दिल्लीला जाण्यावर ते किती टीका करतात. पण सोनिया गांधीच्या बैठकीचा साधा फोटोही त्यांनी जाहीर होऊ दिला नाही. त्यानंतर आता शरद पवार आणि नाना पटोलेंनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही हे जाहीर केले आहे. पवार साहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे शिजत आहे, असं मला वाटतं. पण त्यांच्या डोक्यात जे ३-४ चेहरे असतील त्यात उद्धवजींचा चेहरा नाही,” असा दावा केला.

अन्य लेख

संबंधित लेख