महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करायला लागेल आहेत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? ते घोषित करा, अशी मागणी केली होती. पण, त्यांच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असं म्हणाले आहेत. शरद पवारांनी शिवसेना ठाकरे गट संपवल्याचं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट म्हणाले कि, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीत, हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. हे समजायला जास्त मेंदूची गरज नाही. मात्र त्यांचा मेंदू सडलेला आहे. शरद पवारांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.