Saturday, September 7, 2024

श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय

Share

Shirdi Lok Sabha : “श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय, त्यांना आपण मतदान करणार का..? त्यांच्या अहंकाराची लंका जाळून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे. त्याचा अवश्य उपयोग करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदाशिव लोखंडे खासदारकीची हॅट्ट्रिक साधत पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट कराल”, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्रीरामपूर (Shrirampur) येथील सभेत केलं.

शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. “शहराच्या नावात असलेले श्रीराम ज्यांनी तंबूतून काढून मंदिरात नेऊन बसवला त्या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा” असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

तसेच, “आधी आपल्या देशावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला करायचे, आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून न्यायचे. त्यावेळी आपले तत्कालीन पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत दाद मागायचे. मात्र आता पुलवामा मध्ये लष्करावर हल्ला झाला तेव्हा बालाकोटमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून त्याचा बदला घेण्यात आला. त्यामुळे आताचा नवीन भारत हा मजबूत भारत आहे”, असही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख