Thursday, October 10, 2024

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी

Share

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांतील कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहित येत्या पंधरा दिवसांत लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ इथल्या एका कार्यक्रमात केल्यानंर जिल्ह्यातील नेते, सरपंच आणि ठेकेदार सर्तक झाले आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा निधी हा पालकमंत्री, आमदार यांच्या शिफारशींशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मिळावा, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. पालकमंत्र्यांनी खासदार, आमदारांच्या आदेशानेच जिल्हा परिषदेतील सर्व निधीचे वितरण करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख