Thursday, November 21, 2024

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल

Share

शेतकऱ्यांनो, झारीतील शुक्राचार्य ओळखा!

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम भरात आलेला आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. विराेधकांनी यात माेठी आघाडी घेतली आहे. खाेटी आश्वासने देण्यासाेबतच साेयाबीनसह कापासाची आयात करून भाव पाडण्यात येत असल्याचा खाेटा प्रचार विराेधकांकडून केला जात आहे. वास्तविक सरकार कधीच साेयाबीन आयात करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, केवळ मतांच्या लाचारीसाठी फेक नॅरेटिव्ह पसरवून लाखाे शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. 

स्वातंत्र्यकाळापासूनच भारतात लांब धाग्याचा कापूस आयात करण्यात येताे. गेल्या ७० वर्षांपासून हा नित्यक्रम सुरू आहे. आता निवडणुका डाेळ्यांपुढे ठेवून काँग्रेसने साेयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव व बाेनस देण्याचे गाजर मतदारांना दाखविले आहे. परंतु, या पक्षाने आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने कितीवेळा पाळली, हे एकदा स्पष्ट करून सांगितले पाहिजे. फडणवीस सरकारने बाजार समित्या दलालमुक्त करण्याचा प्रयत्न केला असता याच लाेकांनी आंदाेलने करून सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. आता हेच लाेक साेयाबीनला कमी दर मिळत असल्याचे सांगून राजकारण करीत आहे. 

भाजपा महायुतीने यंदा साेयाबीनला ४ हजार ८९२ रुपये इतका हमीभाव जाहीर केला. परंतु, बाजार समित्यांमध्ये या दराने खरेदी हाेत नाही, हे खरे असले तरी याला जबाबदार काेण? हे एकदा दलालमुक्त याेजनेविराेधात आंदाेलने करणाऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे. 

साेयाबीनचे दर पुरवठा आणि मागणीवर अवलंबून असतात. यंदा ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना या प्रमुख साेयाबीन उत्पादक देशांमध्ये प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साेयाबीनचे भाव पडले. माेदी सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात २० टक्के वाढ केली. तरीही बाजारात हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना ५०० ते १ हजार रुपये कमी दर मिळत आहे. यास व्यापाऱ्यांची लबाडी कारणीभूत असून याच व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या घामावर पाेसण्यासाठी विराेधकांनी दलामुक्तीच्या वेळी जंगजंग पछाडले हाेते, ही बाब महाराष्ट्रातील शेतकरी कसे काय विसरू शकतील? 

चीन हा जगातील सर्वात माेठा साेयाबीन आयातदार देश आहे. परंतु, मागील ५ वर्षांपासून या देशाने मागणी वाढविण्याऐवजी उलट कमी केल्याने भारतासारख्या साेयाबीन उत्पादक देशाला माेठा फटका बसला आहे. भारत जगात पाचव्या क्रमांकाचा साेयाबीन उत्पादक देश आहे. दरवर्षी महाराष्ट्रात साधारणत: ४० ते ४२ लाख हेक्टर क्षेत्रात साेयाबीन लागवड केली जाते. परंतु, यंदा तब्बल ५१ लाख हेक्टरात साेयाबीन लागवड झाल्याची नाेंद करण्यात आली. इतक्या माेठ्या प्रमाणात लागवड हाेऊनही पश्चिम विदर्भातील उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमीच आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात साेयाबीनचा पेरा अधिक असताे. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी साेयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देण्याची गॅरंटी देताच काँग्रेसने ७ हजार रुपये हमीभाव आणि बाेनसचे आश्वासन जनतेला दिले. ६ दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसने अशी कितीतरी आश्वासने जनतेला दिलीत. यातील किती आश्वासने पाळली, याचा जमाखर्च मागण्याची वेळ आता आली आहे. लाडक्या बहीण याेजनेविराेधात न्यायालयात जाणाऱ्या या लाेकांनीच आता ३ हजार रुपये महिलांना देण्याचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

भारत सरकार साेयाबीन आयात करीत नसले तरी १६० लाख टन खाद्यतेल दरवर्षी आयात करावेच लागते. भारताला दरवर्षी २६० लाख टन खाद्यतेलाची गरज पडते. यातील ९८-१०० लाख टन खाद्यतेल भारतात तयार हाेते. उर्वरित खाद्यतेलासाठी भारत इतरांवर अवलंबून आहेत. रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल, तर अमेरिका-अर्जेटिनाकडून साेयाबीन तेल भारताला आयात करावे लागते. इंडाेनेशिया आणि मलेशियासारख्या देशांकडून भारताला पामतेल घ्यावे लागते. भारतात राेजच्या भाेजनात प्रामुख्याने साेयाबीन तेलाचा वापर केला जाताे. गरजेच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने नाईलाजाने भारताला तेल आयात करावे लागते. परंतु, या विषयावरून विराेधक केवळ सत्तेसाठी साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल करण्याचे पातक करीत आहे. खाेटे बाेलून भाेळ्याभाबड्या शेतकऱ्यांची मते लाटण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणत: ५० लाख टन साेयाबीन उत्पादन हाेते. परंतु, जनतेची गरज पूर्ण करण्याकरिता हे उत्पादन पुरेसे नाहीत. त्यामुळेच सरकारला खाद्यतेल आयात करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु, सत्तेशिवाय ज्यांना जगणे ठावूकच नव्हते, ते आता केवळ खुर्चीसाठी खाेटा प्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

लाेकसभा निवडणुकीत ‘माेदी संविधान बदलविणार’ असा फेक नॅरेटिव्ह पसरवून या लाेकांनी डाॅ. बाबासाहेबांच्या नावावर मते मागितली. वास्तविक यांनीच घटनाकार डाॅ. आंबेडकरांना निवडणुकीत हरविण्यासाठी कुठलीच कसर साेडली नव्हती, ही बाब अद्याप देश विसरलेला नाही. भाजपाच्या सत्ताकाळात देश यशाेशिखरे गाठत आहे. मुद्देच नसल्याने जनतेची दिशाभूल करण्याशिवाय विराेधकांकडे पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे जनतेने अशा खाेट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे.

-पुंडलिक आंबटकर
९८८१७१६०२७

अन्य लेख

संबंधित लेख