Sunday, October 13, 2024

भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही

Share

भाजप महायुतीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही. उलट काँग्रेसच्या
सत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजही लोक सोलापुरात
यायला घाबरतात, असा प्रतिटोला सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या खासदार
प्रणिती शिंदे यांना लगावला. ते होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रादेशिक पर्यटन केंद्रावर
आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यासह केंद्रा भाजप महायुतीची सत्ता असताना सोलापूरसह महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही.
उलट मागच्या पन्नास वर्षांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात दंगली झाल्या. सोलापूरवर दंगलीचा कलंक
त्यांच्यामुळेच लागला, असा आरोप देशमुख यांनी केला.

अन्य लेख

संबंधित लेख