Sunday, July 14, 2024

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

Share

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठीही २५ जून रोजी राज्यसभेच्या पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकाडून (NCP) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Rajya Sabha By- Elections) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला होता. जिथे त्यांनी त्यांची मेहुणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सुनेत्रा पवार यांचा पराभव होऊनही पक्ष नेतृत्वाने या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Pawar) यांना बारामतीत रोखण्याचा धोरणात्मक निर्णय म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे, पक्षाने विशेषतः बारामतीत आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पाठिंबा दिला असून, त्यामुळे या प्रदेशात पक्षाची स्थिती मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, त्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी संसदीय मंडळाची बैठक न झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक 25 जून रोजी होणार असून, सुनेत्रा पवार आज उमेदवारी दाखल करणार आहेत.

सन २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची चार वर्षांची मुदत बाकी असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवली. निवडून आल्यानंतर पटेल यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या २५ जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख