Sunday, October 13, 2024

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत

Share

मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते.

उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले, औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षाच्या दृष्टिकोनातून उद्योजकांना निर्भय आणि विश्वास पूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याबरोबरच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरक्षा देण्यात देण्यात येईल. उद्योगांच्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा वीज यासाठी केलेले काम हे उल्लेखनीय असून उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद असून छत्रपती संभाजी नगर मध्ये विविध मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पांना कार्यरत करण्यात आले आहे. शासन, जनता आणि उद्योजक यावरील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी उद्योगाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून, शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम शासनाने केलं असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख