उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस किती बेईमान आहे हे कळले असेलच शिवाय महाविकास आघाडीमध्ये खरी
लढाई मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर
करायचा तर तेवढा केला. मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचे
मेळावे बंद झाले आहेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, परंतु, कॉंग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार
नाहीत. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे तर कॉंग्रेसमधून नाना पटोले
आणि बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. महाविकास आघाडी मुख्यमंत्री
पदासाठी तर महायुतीमधील घटक पक्ष राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणसाठी सरकार
आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.