Thursday, October 10, 2024

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

Share

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, गुंतवणूकीचा हा प्रवाह असाच सुरू राहणार अ‍सल्याचं ते म्हणाले.

पुढच्या वर्षापर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून, उद्योगनगरी ही ओळख निर्माण होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रकल्पातंर्गत गडचिरोली जिल्ह्यातली ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ५० हजार कोटीपर्यंत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  राज्यातल्या महिलांसाठी भूसंपादनाचे नियम शिथिल केले असून, उद्योगासाठी जमीन देताना महिला उद्योजकांना प्राधान्य दिलं जाईल, असं ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख