Saturday, July 27, 2024

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद

Share

लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या पाठोपाठ भारतीय शब्दकोशात एका नवीन शब्दाची भर पडली आहे. हा नवा शब्द आहे व्होट जिहाद’. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष्याच्या नेत्या मारिया आलम खान यांनी फरूखाबाद येथे एका प्रचार सभेमधेव्होट जिहाद’ या शब्दाचा वापर करून एकच खळबळ माजविली आहे. मारिया खान यांच्या भाषणाची क्लिप समाज मध्यमांवर प्रसारित झाली आणि उत्तर प्रदेशात सनसनी माजली. मरिया खान यांनी ‘संघी सरकारच्या’ विरोधात ‘व्होट जिहादचा’ वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मारिया खान या उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचे वडील समाजवादी पक्षाचे आमदार होते तर पती अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधे संगणक विषयाचे प्राध्यापक आहेत. स्वतः मारिया खान या जामिया इस्लामिया विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी होत्या. त्या सध्या दिल्लीतील जमियानगर भागात निवास करतात. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशात काम करतात. विशेष म्हणजे त्या कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुरशीद यांच्या भाची आहेत. खुरशीद हे स्वतः या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपने तातडीने या विधानाची दाखल घेऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे. समाजवादी पक्ष हा ‘मुस्लिम लीगचा’ अजेंडा चालवीत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. खुरशीद यांनी अपेक्षेप्रमाणे ‘जिहाद’ शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची सारसारव केली आहे. मात्र त्यातील पोकळपणा लगेच समजून येतो.

जिहाद या शब्दाला मुस्लिमांमधे एक विशिष्ठ संदर्भ आहे. कुराणामधे या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे, याच्याशी सर्वसाधारण जनतेला काहीही घेणेदेणे नाही. मुस्लिम समाजाचे वर्तन असे आहे की ‘जिहाद’ म्हणजे बिगर मुस्लिमान विरुद्धचे धर्मयुद्ध, असाच अर्थ जगभर घेतला जातो. उर्दू किंवा अरेबिक भाषा सर्वसाधारण भारतीय जनतेला ज्ञात नाही. या भाषांकडे कायमच परकीय भाषा म्हणून बघितले जाते. या परिस्थितीला जबाबदार कोण, याचा विचार मुस्लिम समाजाने करावा.

ऑक्सफर्ड शब्दकोशात जिहाद या शब्दाचा अर्थ a holy war waged on behalf of Islam as a religious duty’ असा दिला आहे. मेरियम वेबस्टरच्या शब्दकोशात जिहादचा अर्थ a holy war fought by Muslims to defend Islam’ असा दिला आहे. या दोन्ही व्याख्यामधून संघर्ष आणि हिंसा अधोरेखित होते. मुस्लिम समाजाच्या इतिहासावरून ऑक्सफर्ड आणि वेबस्टर मेरियम च्या व्याख्याना पुष्टी मिळते. युरोपने तीन शतके क्रूसेडचा अनुभव घेतला. क्रूसेड म्हणजे येशू आणि पैगंबर यांच्या अनुयायामधील रक्तरंजित संघर्ष. हा संघर्ष सरळ सरळ धार्मिकच होता. या संघर्षामुळे केवळ युरोपच नव्हे तर जगाने फार मोठी किंमत मोजली. जिहाद या शब्दाला या क्रूसेडचाही संदर्भ आहे. परिणामी जिहाद हा शब्दच जगाच्या इतिहासामध्ये बदनाम झाला आहे.

भारतात अलीकडे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद हे भयकारी शब्द प्रस्थापित झाले आहेत. लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या असंख्य घटना देशभरात घडत आहेत. या दोन्ही जिहादामागे इस्लाम धर्माचा प्रसार हाच हेतु आहे. या दोन्ही जिहादामागे शारीरिक हिंसा अटळपणे होत असते आणि यातील victim हिंदुच असतात. एवढे सारे घडत असूनसुद्धा राजकीय पक्षांची मुस्लिम अनुययाची सवय जात नाही. कॉँग्रेस आणि त्याच्या सहकारी पक्षांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. मात्र हे दोन्ही प्रश्न भस्मासुराप्रमाणे आहेत आणि त्याकडे गंभीरपणे बघितले जात नाही. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तर उघड उघड लव्ह जिहादला उत्तेजन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे घटनेतील काही तरतुदींचा वापर केला आहे.

आता व्होट जिहादची नव्याने भर पडली आहे. वास्तविक भारतात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज एकाच पद्धतीने मतदान करीत आला आहे. मशिदीतून निवडणुकीच्या काळात फतवे निघतात. ही बाब वर्षानुवर्षे चालू आहे. भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मशिदीतून आपलयाविरोधात फतवे निघत असल्याचा गंभीर आरोप सातपुते यांनी पुराव्यांसाहित केला आहे. व्होट जिहाद ही त्याच्या पुढची पायरी मानवी लागेल.

व्होट जिहाद या नवीन कल्पनेमागे मतदान म्हणजे धर्मयुद्ध, अशीच भूमिका आहे. मुस्लिम धर्माला किंवा धर्म प्रसाराला अडथळा ठरणाऱ्या लोकांच्या विरोधात जाण्याचे उघड उघड आवाहन यामागे आहे. Believer आणि non-believer अशी उघड उघड विभागणी यामागे दिसून येते. Non-believer म्हणजे हिंदू असा सरळ सरळ अर्थ यामधून निघतो. केरळसारख्या राज्यात ख्रिश्चन समाजसुद्धा लव्ह जिहादचा बळी ठरला आहे. अगदी अलीकडे केरळमधील ख्रिश्चन समाजातील संस्थानी ‘kerala story’ चे विशेष खेळ आयोजित केले होते. ख्रिश्चन समाजातील मुली आणि महिला लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणावर बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे. व्होट जिहाद या कल्पनेमूळे मुस्लिम समाजाला धार्मिक पातळीवर पेटविण्याचा नवा उद्योग आता सुरू झाला आहे. मात्र समाजवादी पक्ष आणि त्याचे साथीदार मूग गिळून शांत बसले आहेत. मुस्लिम समाजाची आक्रमक वृत्ती व्होट जिहादच्यामागे दिसून येते. धर्मापुढे अन्य सर्व काही क्षुल्लक, ही मुस्लिम मानसिकता यामधून दिसून येते. अन्यथा भारतात Muslim Personal Law सारखे कायदे जन्मालाच आले नसते. मुस्लिम धर्म कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या धर्मात हस्तक्षेप सहन करीत नाही. शाहबानो प्रकरण याचे जिवंत उदाहरण आहे. कॉँग्रेसने या विषयात मुस्लिम समाजापुढे अक्षरश:लोटांगण घातले होते. मुस्लिम समाज याच मानसिकतेमधून आजही समान नागरी कायद्याला विरोध करतो. भारतातील ही परिस्थिति अन्य मुस्लिम देशांपेक्षा अधिक गंभीर आहे. अनेक मुस्लिम देशानी कालबाह्य इस्लामिक कायदे आणि परंपरांचा त्याग केला आहे. मात्र भारतात कॉँग्रेस आणि डाव्या विचारांमुळे मुस्लिम समाजाला राजकीय पाठिंबा मिळतो. त्यातूनच व्होट जिहाद सारख्या अतिरेकी कल्पना उदयाला येतात.

या मानसिकतेला शरद पवार यांच्यासारखे नेते पाठिंबा देतात. शरद पवार यांच्या पक्षाने वादग्रस्त सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची निवडणूक जाहीरनाम्यात हमी दिली आहे. मुस्लिम समाजाचे स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवतानाच अन्य धर्मियांच्या अस्तित्वावर अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्याची ही वृत्ती देशविघातक आहे. व्होट जिहादचा एक नमूना केरळच्या निवडणुकीत बघायला मिळाला. केरळमधील अनेक नागरिक पोटासाठी अरब देशात आहेत. त्याना मतदानासाठी केरळमध्ये आणण्यासाथी केरळ मुस्लिम कल्चरल सेंटर या संस्थेने अबू धाबी, कतार, दुबई या सारख्या देशातून विशेष खाजगी विमानांची व्यवस्था केली होती. सुमारे दोनशेहून अधिक मुस्लिम मतदार या विमानातून केरळमध्ये पोचले होते. मुस्लिम मतदार मतदानासाठी किती जागरूक आहेत, याचा हा एक पुरावा आहे. दुर्दैवाने हिंदू मतदार मतदानाच्या दिवशी अजूनही पिकनिकला जाणे पसंद करतो.

धर्माच्या आधारावर मते मागण्यांसाठी ख्रिश्चनसुद्धा मागे नाहीत. केरळ आणि गोव्यामधे ख्रिश्चन संस्था आणि धर्मगुरुनी नेहमीप्रमाणे भारतीय घटना, धर्मनिरपेक्षता, अल्पसंख्याकांवरील हल्ले वगैरेच्या नावाने गळे काढत भाजपविरोधी प्रचार केला. Catholic Bishops Conference of India ने एक पत्रक काढून अश्याच प्रकारे भाजपविरोधी प्रचार केला आहे.

मार्च महिन्याच्या एका अंकात Vatican News ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. Catholic Bishop Conference of India च्या भूमिकेचे समर्थन करताना Vatican News ने भारतातील तथाकथित वाढते धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे ध्रुवीकरण भारताच्या लोकशाहीला आणि सामाजिक सलोख्याला घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारतीय घटना, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मांतर वगैरे विषयांवर या मधे भाष्य केले आहे. याच लेखामधे भाजप आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘nationalist’ असा केला आहे. Vatican News च्या मते बहुधा राष्ट्रवादी असणे हा गुन्हा असावा.

हिंदू समाजाने या पार्श्वभूमीवर सावध, सजग आणि कर्तव्यदक्ष राहून मतदानाचा हक्क बजाविणे अत्यंत आवश्यक आहे. थोडासासुद्धा गलथानपणा, हलगर्जीपणा आणि आळस फार मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकतो. अयोध्या राम मंदिर हा केवळ प्रारंभ आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. ‘Eternal vigilance is the price of democracy’ असे म्हटले जाते. सतत सावध राहणे अत्यावश्यक. आत्मग्लानि धोक्याचीच असते. अयोध्या राम मंदिर हा एका लांब प्रवासाचा टप्पा आहे. राम मंदिर हा हिंदू जागरुकतेचे, श्रद्धेचे आणि संघर्षमयतेचे प्रतीक आहे. ही जागरूकता सतत तेवत ठेवणे आवश्यक आहे.

अन्य लेख

संबंधित लेख