Tuesday, September 17, 2024

पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बद्दल काय बोलले नारायण राणे ?

Share

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्या नंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदे मध्ये त्यांना किल्ल्यावरील झालेल्या राड्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नारायण राणे यांनी म्हटले की, “आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना विरोधी पक्षाचे लोक वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही ते केला आता आणि त्यांचा एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता . तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?, असे नारायण राणे यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली टीका केली . उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्यांच्यासाठी शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्त्व हे म्हणजे पैसे कमावण्याचे साधन आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारला आहे का? त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारी नाही. त्यांना बोलता येत नाही. शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणसाठी काय केले? कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या, किती प्रकल्प आणले, किती पूल बांधले, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. पुढे ते आदित्य ठाकरेंन विषयी बोलताना नारायण राणे म्हणाले आदित्य ठाकरे हे आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला, असे म्हणतात. पण राड्यामुळेच शिवसेना नावारुपाला आली. तेव्हा आदित्य ठाकरे शेंबडा होता, उद्धव ठाकरेंनाही काही माहिती नव्हते, ते इकडे नव्हते.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. या पुतळ्याचं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले होते. मात्र, ऐन पावसाळ्यात जोरदार वाऱ्यांमुळे हा पुतळा कोसळला. मी यामध्ये कोणावर दोषारोप करण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला त्या टेक्निशियन लोकांची चौकशी व्हावी, अशी मागणी करतो. कशामुळे हा पुतळा कोसळला, याचे कारण बाहेर यावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, ही माझी इच्छा असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.

अन्य लेख

संबंधित लेख