Wednesday, January 15, 2025

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग”

Share

महाराष्ट्र : शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे.’ अशी टीका त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. ‘खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही. म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन यावेळी दरेकर यांनी मतदारांना केले.

प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग आहे. नाटकात जसा शेवटचा अंक असतो. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे आता चालणार नाही. यासाठी प्रेक्षकांनी म्हणजेच जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा. त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला. यामुळे आता त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली’, असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख