Tuesday, December 3, 2024

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

Share

मुंबई : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गडचिरोली पोलिसांचे (Gadchiroli Police) विशेष अभिनंदन केले आहे.

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ १२-१५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती. या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे ६ तासांहून अधिक काळ सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. यावेळी तीन एके ४७,२ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख