IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक टप्पा आता लखनौमध्ये येऊन पोहोचला आहे. आज (ता. १७) मालिकेतील चौथा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे.
भारताला मालिका विजयाची संधी
भारतीय संघाने सध्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिका आपल्या नावावर करेल. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय खेळाडू विजयाचा चौकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
अक्षर पटेलला दुखापत; शाहबाज अहमदची एन्ट्री
सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल प्रकृती अस्वास्थ्यामुळे उर्वरित दोन्ही टी-२० सामन्यांतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) अधिकृतपणे ही माहिती दिली असून, त्याच्या जागी शाहबाज अहमद याला संघात पाचारण करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. मालिका वाचवण्यासाठी आफ्रिकेसाठी विजय अनिवार्य आहे, तर भारतीय संघ विजयाची ही सुवर्णसंधी सोडू इच्छिणार नाही.