Thursday, December 25, 2025

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर

Share

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी या जागेसाठी पाठपुरावा करत होते. या मागणीची दखल घेत, धाराशिव शहरातील सर्व्हे क्र. ४२६ येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे अण्णाभाऊंच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख