उबाठा-मनसे युतीच्या घोषणेने भारावून गेलेला लाचार सेनेचा एक सैनिक… (आपण त्याला मर्द मावळा म्हणू…) भेटला… विधानसभा निवडणुकीनंतर पार ढेपाळलेला हा गडी युती झाल्यापासून सत्तरीच्या म्हाताऱ्याने व्हायेग्रा खाऊन तरतरीत व्हावे… तशा टणाटण उड्या मारत होता… त्याचा एकच धोशा चालला होता…
आता एमएम… MM आमचाच… आता एमएम… MM आमचाच…
मी MM म्हणजे मुंबईचा मेयर समजलो… म्हटलं MM आमचाच म्हणायला निवडणूक तर होऊ दे… निकाल तर लागू दे…
तसा तो मर्द मावळा माझ्यावर डाफरला… अरे xxx… MM आमचाच म्हणायला निवडणुका कशाला व्हायला पाहिजेत?… युती झाली तिथेच MM आमचा झाला…
मी माझ्या अजागळ मुद्रेने त्याच्याकडे बघत… आपला MM चा अंदाज चुकला अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि… अजून एक MM म्हणजे मला मालाडचा MM मिठाईवाला ठाऊक आहे… पण तुमच्या दृष्टीने तो परप्रांतीय आहे… तो तुमचा महापौर झाला की फुकट मिठाई देणार आहे की काय?… म्हणून माझ्या मालवणी खवचटपणाचा हिसका दाखवला…
आता मात्र त्या मर्द मावळ्याच्या संयमाचा बांध फुटला आणि… त्याने सांगितलेल्या “MM आमचाच” या त्याच्या टुमण्याचा अर्थ ऐकून मी हादरलोच…
त्याच्या MM आमचाचचा अर्थ होता… मुंबई ४०% मराठी (M) आणि २०% मुसलमान (M) मतदार आहेत… असे हे ६०% MM आता आम्हालाच मतदान करणार… कारण दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे हा ४०% मराठी मतदार दुसरीकडे कुठेच जाणार नाही आणि मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी मनं जिंकलेली असल्यामुळेच ही २०% मतं सुद्धा नक्की आम्हालाच मिळणार… ६०% मतं मिळाल्यावर महापौर आमचाच…
त्याने फुलटॉस दिला आणि मी स्टेडियमच्या बाहेर बॉल मारला नाही हे घडणे शक्यच नव्हते… गोड बोलून त्या मर्द मावळ्याला वडापावच्या गाडीवर घेऊन गेलो… वडापावची ऑर्डर दिली… आणि एक एक वडापाव संपवून… दुसरा हातात घेऊन वडापाव बरोबर चहा घेऊया म्हणून… शेजारच्या चहाच्या टपरीवर गेलो… तिथे वडापाव बरोबर चहा घेता घेता… त्याच्या “MM आमचाच”ची “मायचा मायची” करत वासालात लावली…
म्हटलं… अरे महाxxx… मला एक सांग… तुम्हाला जे नक्की मत देणार नाहीत ते उरलेले ४०% कोण आहेत?…
तो म्हणाला… परप्रांतीय…
मी म्हटलं… ते तुझ्यासाठी परप्रांतीय असतील… आमच्यासाठी ते अन्य प्रांतीय अमराठी भाषिक हिंदू आहेत… त्यांची ४०% मतं तुम्हाला न मिळता… महायुतीलाच मिळणार हे तुला मान्य आहे ना?…
तो चटकन म्हणाला… हो…
मग मी म्हटलं… आजपर्यंत अन्य प्रांतीय अमराठी भाषिक मुंबईकर मतदार तुम्हाला मतदान करत होता तो… तुमची भाजपबरोबर असलेली युती आणि तुमच्या हिंदुत्वामुळे… तुमच्या साहेबांनी हिंदुत्व सोडलं त्यामुळे या ४०% अन्य प्रांतीय अमराठी भाषिक मुंबईकर मतदाराने तुम्हाला सोडलं…
मी पुढे म्हटलं… ऐक… मुंबईतला ४०% मराठी भाषिक मतदार एकगठ्ठा तुम्हाला कशाला मतदान करेल?… राम नाईकांपासून अमित साटमांपर्यंत मुंबई भाजपचे कितीतरी मराठी अध्यक्ष त्याने बघितलेले आहेत… मुंबईत मनीषाताई चौधरीं, पुनमताई महाजनांपासून राहुल नार्वेकरांपर्यंत भाजपचे कितीतरी मराठी आमदार खासदार नगरसेवक मतदारांनी निवडून दिलेले आहेत… विनोद तावडे, आशिष शेलार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, सुनील राणे… मुंबई भाजपचे असे असंख्य मराठी नेते अनेक वेळा निवडून आलेले आहेत… मुंबईकर मराठी माणसाच्या डोळ्यासमोर आहेत… हिंदुत्वासाठी तो त्यांना भरभरून मतदान करतो म्हणूनच ते परत परत निवडून येतात ना?
शिवाय आमच्या महायुतीतील रिपब्लिकन पक्षाच्या रामदासभाई आठवले यांना मानणारा खूप मोठा मुंबईकर मराठी भाषिक मतदार वर्ग हा महायुतीलाच मतदान करतो… तो मराठी भाषिक आहे म्हणून तो ठाकरे बंधूंनाच मतदान करेल हे मानणे म्हणजे… भुजबळ आणि आर्मस्ट्राँग यांचे गोत्र एकच आहे समजण्यासारखे आहे… (यावर तो मर्द मावळा ओशाळवाणा हसला)…
मुंबईच्या मराठी मतदाराचे ठाकरे बंधूंनी पेटंट घेतलं आहे का? म्हणजे एखादा मराठी भाषिक मुंबईकर ठाकरे बंधूंना मते देत नाही म्हणजे तो मराठी नाही का…? मुंबईकर मराठी मतदाराला गृहीत धरून तुम्ही आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहात…
मुंबईचा मराठी मतदार जसा भाजपला मतदान करतो तसा तो काँग्रेसलाही करतो… मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड आहेत… त्याही मराठी भाषिक आहेत… मुंबई काँग्रेसने गुरुदास कामत, भाई जगताप यांच्यासारखे कितीतरी मराठी भाषिक अध्यक्ष आणि महापौर दिलेले आहेत… मुंबईकर मराठी मतदाराने मतदान केल्याशिवाय काँग्रेसचे आमदार, खासदार, नगरसेवक मुंबईतून निवडून येणे शक्य आहे का…? आणि ती काँग्रेस आता तुमच्याबरोबर नाहीये… मग काँग्रेसचा मराठी भाषिक मतदार तुम्हाला कशाला मतदान करेल…?
शिवाय ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आहे… त्यांचाही मुंबईतील मतदार वर्ग खूप मोठ्या संख्येने मराठी भाषिकच आहे… तेही तुमच्याबरोबर नाही तर ते तुम्हाला कशाला मतदान करतील…?
तेव्हा ४०% मराठी M मधली किमान २०% म्हणजे अर्धी मते तुम्हाला कशीच मिळणार नाहीत…
आता हिशोब लाव उरलेल्या २०% मुसलमानांच्या M चा… २०१४ पूर्वी या २०% M साठी भाजप आणि शिवसेना सोडून बाकी सर्व राजकीय पक्षांकडून कायम खूपच लांगूलचालन सुरु होतं… त्यात काँग्रेस सगळ्यात पुढे होती… पण नंतर त्यात समाजवादी पक्ष, बसपा आणि आता MIM ने चांगलीच वाटमारी केली आहे… मुंबईत बसपा नाही पण उरलेले समाजवादी पक्ष आणि MIM… कोणीच तुमच्याबरोबर नाहीत… मुस्लीम मते खेचू शकणारी श.प राष्ट्रवादी काँग्रेस देखील तुमच्यासोबत नाही… तरी तुला वाटतं २०% मुस्लीम मतं एकगठ्ठा तुम्हाला मिळतील…?
२०१४ पासून गेली ११ वर्षे मोदीजी, अमित शहा, योगीजी, देवेंद्रजी यांनी न बोलता… आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या कार्यक्रमातून हिंदू मतदारांचे चांगले ध्रुवीकरण केले आहे… या देशात हिंदू देखील राहतो आणि त्याला देखील मान सन्मान मन भावना आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली… त्यामुळे भाजपचा आणि पर्यायाने महायुतीचा मतदार हा हिंदुत्वासाठी मतदान करणार आहे. मग तो कुठल्याही प्रांतातील असो अथवा कुठलीही भाषा बोलणारा असो. मतदार म्हणून त्याचा परिचय “हिंदू मतदार” असाच आहे. नेमकं तेच हिंदुत्व तुम्ही सोडलंत आणि सगळी हिंदुत्ववादी मते भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या पारड्यात आणून टाकलीत…
बरं… मुख्यमंत्री असताना असं काय उद्धव ठाकरेंनी मुसलमानांसाठी भव्य दिव्य केलंय की मुंबईचा मुसलमान मतदार तुम्हाला भरभरून मतदान करेल…?
नाही म्हणायला काँग्रेसच्या अस्लम शेखला मुंबईचा पालकमंत्री केला… उर्दू भाषा भवन बांधायला भायखळ्यासारख्या हिंदू बहुल वस्तीत जमीन दिली… अजान स्पर्धा आयोजित केली… जनाब बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उर्दू कॅलेंडर छापले. ज्या रझा अकादमीने मोर्चा काढून आझाद मैदानावर नंगानाच घातला होता त्याच रझा अकादमीच्या नेत्यांना मुख्यमंत्री असताना तुझ्या साहेबाने मिठ्या मारल्या होत्या. ही पुण्याई त्यांच्या गाठीशी आहे पण…
तुझ्या साहेबाच्या या सगळ्या हिरव्या जादूटोण्याने मुंबईतला सर्व भाषिक हिंदू मतदार मनातून हादरला आहे. ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई दिली तर मुंबई गुजरातला जोडायची अफवा बाजूला राहील आणि हे मुंबई पाकिस्तानच्या कराचीला जोडतील. मुंबईच्या प्रत्येक पदपथावर फेरीवाले म्हणून आणि झोपडपट्ट्यांमध्ये रहिवासी म्हणून फक्त बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या दिसतील अशी त्याला प्रचंड भीती वाटते… हिंदू म्हणून स्वतःचा विचार करताना त्याला मुंबईतले आपले अस्तित्वच पणाला लागले आहे याची जाणीव होते… आणि म्हणून तो ठाकरे बंधूंपासून मनाने कोसो दूर पोहोचला आहे…
त्याच वेळी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या रूपाने हिंदूंचा एक तारणहार आणि आश्वासक नेता दिसतो… भाजपच्या रूपाने त्याला आपल्या बाजूने कोणीतरी ठामपणे उभा राहणारा राजकीय पक्ष असण्याची खात्री पटते…
आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी तुझ्या साहेबाने स्वतःचा सुंता करून घेतला तरी… बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी तुम्ही घेतलेलं क्रेडिट… तुमचा भगवा ध्वज… वंदनीय बाळासाहेबांना तुम्ही देत असलेली हिंदुहृदयसम्राट ही उपाधी… राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी केलेला अट्टाहास… मुसलमान कधीच विसरणार नाही… आणि मनातून तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही… ज्या काँग्रेसबरोबर तुम्ही होतात म्हणून मुसलमान तुम्हाला मतं देत होते… ती काँग्रेस आज तुमच्यासोबत नाही… मुसलमानांचे मसीहा समजले जाणारे श.प राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि MIM देखील तुमच्यासोबत नाही… मग या M च्या २०% तली २% मते तुम्हाला मिळाली तरी
खूप…
त्यातल्या त्यात जिथे तुमचा उमेदवार आपल्या मतांनी… महायुतीच्या विशेषत: भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतो असे मुसलमानांना वाटेल त्या मतदारसंघात स्ट्रॅटेजी म्हणून मुसलमान मतदार तुम्हाला मते देईल… बाकी मुसलमानांची मते काँग्रेस, श.प राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि MIM लाच मिळतील…
म्हणजे एकूण जेमतेम २२% मुंबईकरांची मते तुम्हाला मिळतील… २२% मते म्हणजे ४० ते ५० जागा मिळाल्या तरी महापौर आपलाच झाला असे समजून तुम्ही फटाके वाजवा…
दुसऱ्या बाजूला ४०% अन्य प्रांतीय अमराठी भाषिक हिंदू मतदार… त्यातला १०% काँग्रेस व अन्य पक्षांना मतदान करेल असे गृहीत धरले तर राहिलेले ३०% आणि मराठी भाषिकांपैकी हिंदुत्वाला मानणारा जवळपास २०% मतदार हा भाजप प्रणित महायुतीला मतदान करेल… म्हणजे किमान ५०% मतदान महायुतीलाच होईल… ५०% मतदान म्हणजे महायुती सहज बहुमताचा ११४ चा आकडा पार करून १५०- १६० पर्यंत पोहोचेल कारण…
ही निवडणूक MM नाही तर H x M होणार आहे…
मी त्या मर्द मावळ्याच्या MM ची केलेली मायचा मायची ऐकून… वडापाव त्याच्या घशात करलीच्या काट्यासारखा अडकला… कसाबसा वडापाव आणि चहा संपून त्याने मला जय महाराष्ट्र केले आणि धूम ठोकली…
बहुदा फटाक्यांची ऑर्डर द्यायला गेला असावा…
-मालवणी खवट्या