Monday, December 29, 2025

भाजपची पहिली ६६ जणांची यादी जाहीर! ‘वसंत स्मृती’त रात्रभर AB फॉर्मचे वाटप

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, भारतीय जनता पक्षाने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत आपल्या पहिल्या ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच दादर येथील भाजपचे मुख्यालय ‘वसंत स्मृती’ येथे उमेदवारांना ‘AB’ फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपने यावेळेस कमालीची गोपनीयता पाळली आहे. ज्या जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये एकमत झाले आहे, अशा प्रभागांमधील उमेदवारांना मध्यरात्री १ वाजेपासून फोन करून कार्यालयात बोलावण्यात आले. पहाटेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत ६६ उमेदवारांच्या हातात पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आले. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अधिकृतरीत्या यादी प्रसिद्ध करण्याऐवजी उमेदवारांना थेट फॉर्म देण्याची रणनीती अवलंबली आहे.

पहा ६६ उमेदवारांची संपूर्ण यादी

वॉर्ड क्रमांकवॉर्डचे नावनाव
2गोंदेवी – दहिसर (पूर्व)तेजस्वी घोसाळकर
7मंडपेश्वरगणेश खणकर
10दौलत नगरजितेंद्र पटेल
13राजेंद्र नगरराणी त्रिवेदी
14बोरीवली TPS III – कोरा केंद्रसीमा शिंदे
15एस्कर – योगी नगरजिग्ना शाह
16चिकुवाडी – कांती पार्क – एमएचबी कॉलनीश्वेता कोरगावकर
17चारकोप (उत्तर)शिल्पा सांगोरे
19चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटदक्षता कवठणकर
20महावीर नगर – धनुकरवाडीबाळा तावडे
23पोईन्सूर (पूर्व) – राजाराम नगर – अशोक नगरशिवकुमार झा
24समता नगर – दत्तानी पार्कस्वाती जैस्वाल
31आदर्श दुग्धालय – एव्हरशाईन नगरमनिषा यादव
36मालाड हिल रिझर्व्हॉयरसिद्धार्थ शर्मा
37म्युनिसिपल कॉलनी मालाड (पूर्व)प्रतिभा शिंदे
43न्यू कलेक्टर कॉलनीविनोद मिश्रा
46दिंडोशी – पांडुरंगवाडीयोगिता कोळी
47आरे कॉलनी (पूर्व)तेजिंदर सिंह तिवाना
52सिद्धार्थ नगर – जवाहर नगरप्रीती साटम
57आदर्श नगर – अंबोली हिलश्रीकला पिल्ले
58सहाजी राजे क्रीडा संकुल – मालकॉम बागसंदीप पटेल
59सेवन बंगले – वर्सोवा (दक्षिण)योगिता दाभाडकर
60मनीष नगर – भवन्स कॉलेजसयाली कुलकर्णी
63भक्ती वेदांत मंदिर – कूपर हॉस्पिटलरुपेश सावरकर
68शिवनेरी वसाहत – मेघवाडीरोहन राठोड
69शंकरवाडी – पारशी पंचायतसुधा सिंह
70स्क्वॅटर्स कॉलनी – तोलानी कॉलेजअनिश मकवानी
72गुंदावली (पूर्व) – ईएसआयएस हॉस्पिटलममता यादव
74विजय नगर – भवानी नगरउज्ज्वला मोडक
76चकाला – सहार विमानतळप्रकाश मुसळे
84कालिना गाव – सांताक्रूझ कॅन्टोन्मेंटअंजली सामंत
85भारत नगर (पूर्व)मिलिंद शिंदे
87डाऊरी कॉलनी – खार रायफल रेंजमहेश पारकर
97लीलावती हॉस्पिटल – बांद्रा बस टर्मिनसहेतल गाला
99मुलुंड चेक नाका – ईएसआयएस हॉस्पिटलजितेंद्र राऊत
100टोपिवाला कॉलेज – गावणपाडा – म्हाडास्वप्ना म्हात्रे
103जॉन्सन & जॉन्सन – सर्वोदय नगर – नाहूरहेतल गाला मार्वेकर
104मिलिंद नगर – गावदेवी हिल्सप्रकाश गंगाधरे
105भांडुप गावअनिता वैती
106गावदेवी (भांडुप)प्रभाकर शिंदे
107नर्दास नगरनील सोमय्या
108कोकण नगर – भट्टीपाडादिपिका घाग
111कांजूर गावसारिका पवार
116विहार लेक – पवई लेक – पवसपाडाजागृती पाटील
122भाटवाडी – भारवे नगरचंदन शर्मा
126रामाबाई नगरअर्चना भालेराव
127गरोडिया नगर – सोमय्या कॉलेजअलका भगत
129लोटस कॉलनी – रफीक नगरअश्विनी मते
135चित्ता कॅम्पनवनाथ बन
144सिद्धार्थ कॉलनी – बसंत पार्क गोल्फ क्लबबबलू पांचाळ
152मोहिली गावआशा मराठे
154कामिनी इंडस्ट्रीज – साकी नाकामहादेव शिगवण
172कोरबा मिठागर – वडाळा सॉल्ट पॅनराजश्री शिरोडकर
174हिंदू कॉलनी – पारशी कॉलनीसाक्षी कनोजिया
185रवींद्र नाट्यमंदिर – शिवाजी पार्करवी राजा
190वरळी बीडीडी चाळशितल गंभीर देसाई
195रणजित स्टुडिओ – नायगाव बीडीडी चाळराजेश कांगणे
196नायगाव पोलीस परेड ग्राउंड – बीपीटी हॉस्पिटलसोनाली सावंत
207अंजीरवाडी – डॉकयार्ड – माझगावरोहिदास लोखंडे
214कमला नेहरू पार्क – राजभवनअजय पाटील
215प्रार्थना समाज – ओपेरा हाऊससंतोष ढोले
218चंदनवाडी – चिराबाजार – जिमखानास्नेहल तेंडुलकर
219मुंबादेवी – मुलजी जेठा मार्केट – धोबी तलावसन्नी सानप
221इमामवाडा – डोंगरीआकाश पुरोहित
226ससून डॉक – वर्ल्ड ट्रेड सेंटर – गीता नगरमकरंद नार्वेकर
227आर.सी. चर्च – कोलाबा दांडी – नेव्ही नगरहर्षिता नार्वेकर

अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा संगम
या पहिल्या यादीत प्रामुख्याने माजी नगरसेवकांसह काही नव्या दमाच्या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ‘मेरीट’ आणि निवडून येण्याची क्षमता (Elective Merit) हाच एकमेव निकष लावून भाजपने ही यादी तयार केली आहे. महायुतीमध्ये काही जागांवरून अद्याप तिढा असला, तरी भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये पक्षाने वेळ न घालवता उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.

काय आहे भाजपचे ‘मिशन १५०’?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाची गती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूक्ष्म नियोजन या जोरावर भाजपने यावेळी ‘मिशन १५०’ चे लक्ष्य ठेवले आहे. प्रस्थापित नेत्यांच्या जोडीला तरुण, सुशिक्षित आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देऊन “नव्या मुंबईचा नवा चेहरा” समोर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईवर आपली एकहाती पकड मजबूत करण्यासाठी भाजपने ही पहिली ६६ उमेदवारांची यादी महत्त्वाची मानली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख