Tuesday, December 30, 2025

BMC Election 2026 : मनसेची पहिली यादी जाहीर; १५ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चे वाटप

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि राजकीय समीकरणे गोपनीय ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’ (AB Form) देण्याचा निर्णय घेतला आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी ‘डायरेक्ट’ फिल्डिंग
एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने अधिकृत यादी जाहीर केल्यास पक्षात धुसफूस होण्याची शक्यता असते. हीच शक्यता ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रबळ उमेदवारांना वैयक्तिकरित्या बोलावून उमेदवारीची पत्रे सोपवली आहेत. मनसेकडून आतापर्यंत १५ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, यामध्ये जुन्या निष्ठावंतांसह नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे.

शिवसेना UBT कडूनही फॉर्म वाटप सुरू
दुसरीकडे, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शिलेदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीला रोखण्यासाठी मुंबईच्या गल्लीबोळात शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आता ‘एकत्र’ प्रचार करताना दिसणार आहेत.

मनसेच्या १५ संभाव्य उमेदवारांची यादी (पहिली यादी)

अनु. वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
वॉर्ड १९२यशवंत किल्लेदार
वॉर्ड १८३पारूबाई कटके
वॉर्ड ८४रूपाली दळवी
वॉर्ड १०६सत्यवान दळवी
वॉर्ड ६८संदेश देसाई
वॉर्ड २१सोनाली देव मिश्रा
वॉर्ड ११कविता बागुल माने
वॉर्ड १५०सविता माऊली थोरवे
वॉर्ड १५२सुधांशू दुनबाळे
१०वॉर्ड ८१शबनम शेख
११वॉर्ड १३३भाग्यश्री अविनाश जाधव
१२वॉर्ड १२९विजया गीते
१३वॉर्ड १८सदिच्छा मोरे
१४वॉर्ड ११०हरिनाक्षी मोहन चिराथ
१५वॉर्ड २७आशा विष्णू चांदर

अन्य लेख

संबंधित लेख