उत्तराखंडातील कोटद्वारमधील वकील अहमद यांचे ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक बजरंग दलाचे कार्यकर्ते “बाबा स्कूल ड्रेस” दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानाचे मालक वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील “बाबा” हे हिंदुदर्शक नाव काढून टाकायला सांगितले.

उत्तर भारतात हिंदू समाज साधुसंतांना बाबा म्हणतो. देवराह बाबांपासून बुलडोझरबाबांपर्यंत उत्तर भारतातील अनेक बाबा प्रसिद्ध आहेत. व्यवसाय करताना हिंदू नाव घ्यायचे. मालकाने आपली खरी ओळख लपवून ठेवायची आणि जेव्हा हिंदूंचे सण उत्सव यात्रा साजऱ्या होत असतात तेव्हा खुलेआम त्याच्यावर दगड फेकायचे. लँड जिहाद करायचा.
बजरंग दलाचा आक्षेप याच्यावर आहे. म्हणून त्यांनी वकील अहमद यांच्या दुकानाच्या “बाबा स्कूल ड्रेस” नावाला आक्षेप घेतला. अर्थात् वकील अहमद यांनी तसेच त्यांचा मुलगा मोहम्मद शोएब यांनी त्यास नकार दिला आणि वादावादी सुरू झाली तेव्हा दीपक नावाचा एक तरुण या वादावादीत पडला. त्याने वकील अहमद यांची बाजू घेतली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना विरोध करत त्याने प्रचंड वाद घातला. शेवटी दुकानाचे नाव आहे तेच राहिले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव “दीपक मोहम्मद” असल्याचे सांगितले. वास्तविक दीपक मोहम्मद हा दीपक कश्यप आहे. तो एक जिम ट्रेनर आहे व कोटद्वार मध्ये त्याची स्वतःची “हल्क जिम” नावाची व्यायामशाळा आहे. एकूणच हे प्रकरण आणि त्या निमित्ताने दीपक मोहम्मद चांगलेच चर्चेत आले.
दीपक मोहम्मदच्या आगाऊपणामुळे कोटद्वाराच्या स्थानिकांनी त्याच्या जिममधून आपले सदस्यत्व काढून घेतले. त्याच्या जिममध्ये आता १५० पैकी फक्त १५ सदस्य उरले आहेत. लगेच सर्वोच्च न्यायालयातील १२ वरिष्ठ वकिलांनी १० हजार रुपये भरून त्याच्या जिमची (नाव जाहीर न करण्याच्या अटीवर) सदस्यता घेतली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन बिट्टास यांनी कोटद्वारला जाऊन दीपक मोहम्मदची भेट घेतली. आणि आपल्या पक्षाची “धर्मनिरपेक्षते”साठी असलेली वचनबद्धता (solidarity) त्याच्याकडे व्यक्त केली. देशातील “धर्मनिरपेक्षता” “गंगा जमुना तहजीब” आणि “भाईचारा” चा किडा चावलेल्या पुरोगामी, लेफ्टीस्ट गँग्सना चघळायला एक नवीन विषय आणि एक नवीन आदर्शाचा पुतळा (icon) मिळाला.

आता इतके झाल्यावर “मोहब्बत की दुकान”चे चालक पालक आणि मालक राहुल गांधींनी या प्रकरणात उडी घेतली नसती तरच नवल. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी दीपक मोहम्मदला दिल्लीला बोलवून घेतले. काल दोघांची भेट झाली. तशी पोस्ट राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आहे. सोबत “हर इन्सान, एक समान यही है भारतीयता, यही है मोहब्बत की दुकान।” म्हणून नेहमीची लाडकी पोपटपंची देखील केली आहे. ही भेट १०, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी झाली त्यामुळे सोनिया गांधी देखील तिथे उपस्थित होत्या. तसेच राहुल गांधींनी फोनवरून दीपक मोहम्मद यांच्या पत्नीशी देखील बोलणे केले. राहुल गांधींनी दीपक मोहम्मदच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याच्या बाजूने उभे राहण्याची ग्वाही देखील दिली आहे तसेच कोटद्वारला येऊन दीपक मोहम्मदच्या हल्क जिमची सदस्यता घेण्याची देखील हमी दिली आहे. कदाचित जिमच्या एका कोपऱ्यात आपल्या “मोहब्बत की दुकान” ची फ्रॅंचाईजीसुद्धा ते सुरू करतील.
राहुल गांधींच्या हमीवर किती विश्वास ठेवायचा हे दीपक मोहम्मदने ठरवायचे आहे कारण राहुल गांधींच्या पणजोबांपासूनच्या चार पिढ्या भारतवासीयांना “गरिबी हटाव”ची हमी देत आहेत. आता देशवासीयांनी त्यांच्या या हमीवर विश्वास ठेवणे सोडून दिले आहे.
मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इन्किलाब या प्रतिष्ठित उर्दू दैनिकाने आज आपल्या मुखपृष्ठावर छायाचित्रासह ही बातमी रंगवून रंगवून छापली आहे. माहे रमजाननंतर दीपक मोहम्मद “इन्सानियत जोडो” यात्रा काढणार आहे असेही बातमीत म्हटले आहे. तरीही दीपक मोहम्मद म्हणतो, “मी काही काँग्रेसमध्ये गेलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला बोलावले तर मी त्यांनाही भेटायला जाईन.”

कोणाला भेटायचे आणि कोणाला भेटायचे नाही, कोणती टोपी डोक्यावर घालायची आणि कोणती नाही हे नीट माहीत असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले आहेत. हे दीपक मोहम्मद बहुदा विसरला असावा. या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियावर आम्ही एक मार्मिक टिप्पणी वाचली. “पता नहीं ऐसे कितने ‘दीपक मोहम्मद’ आये… दीपक बुझ गए और मोहम्मद रह गए।” इतिहासातील अशाच एका “दीपक मोहम्मद”ची करुण कहाणी आम्ही दीपक कश्यपला सांगू इच्छितो.

ही कहाणी आहे १८८८ साली जन्मलेल्या लाहोरच्या प्राध्यापक ब्रिज नारायण यांची. ते एक प्रख्यात हिंदू अर्थशास्त्रज्ञ होते. लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि कायदे आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांचे कट्टर समर्थक. अर्थात् इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मागणीचे उघड समर्थक. आर्थिकदृष्ट्या तो एक सफल व आत्मनिर्भर देश बनेल अशी त्यांना ठाम खात्री होती. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बाबतीत प्रा. ब्रिज नारायण Loyal Than The King अशा मानसिकतेचे होते. त्यांनी कृषी अर्थशास्त्र आणि भारताच्या आर्थिक समस्यांवर ‘इक्तिसादी निजाम’ (१९३७) आणि ‘इल्म-ए-दौलत’ (१९३९) अशी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा खूप अभिमान होता. (दीपक कश्यप तुझ्यापेक्षा शतपटीने अधिक होता.)
प्रा. ब्रिज नारायण यांचा असा ठाम विश्वास होता की, भारतातील मुस्लिमांना त्यांच्या स्वतःच्या देशाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी या मागणीला पाठिंबा देण्यासाठी असंख्य पुस्तके आणि लेख लिहिले. या प्रत्येक लेखात त्यांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीच्या बाजूने असंख्य युक्तिवाद सादर केले आणि मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. (त्या मानाने तू अगदीच किरकोळ भाईचारावाला आहेस रे दीपक कश्यप) त्यांचा असाही विश्वास होता की केवळ स्वतंत्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच मुस्लिमांच्या हिताचे खरेखुरे रक्षण करेल. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये गैर-मुस्लिमांविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही या कायदे आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांच्या या वचनावरही त्यांचा दृढ विश्वास होता. जेव्हा भारताच्या विविध भागांमध्ये वेगळ्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची मागणी करणाऱ्या हिंदूंवर देखील (हिंदू म्हणजेच काफीर म्हणून) पद्धतशीर हल्ले केले गेले तेव्हा प्राध्यापक ब्रिज नारायण यांनी त्यांना नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून फेटाळून लावले. जेव्हा एखादी मोठी चळवळ सुरू असते तेव्हा अशा घटना घडतात असे प्रा. ब्रिज नारायण म्हणाले, कायदे आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना त्यांच्या कामावर बेहद्द खूप खूश होते आणि त्यांनी प्रा. ब्रिज नारायण यांना स्वतंत्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापना झाल्यावर तिथेच राहण्याची विनंती केली. (प्रा. ब्रिज नारायण यांना आतल्या आत बेसुमार गुदगुल्या झाल्या असतील)

पण जेव्हा हिंदू समाजाची खात्री पटली की आता हिंदुस्तानची फाळणी अपरिहार्य आहे. तेव्हा मे १९४७ मध्ये लाहोर आणि आसपासच्या शहरांमध्ये राहणारे हिंदू दिल्ली आणि अमृतसरला स्थलांतरित होऊ लागले. ऑगस्ट १९४७ पर्यंत लाहोरमध्ये फक्त १०,००० हिंदू राहिले. या उर्वरित हिंदूंना वेडी आशा होती की, अजूनही परिस्थिती सामान्य होईल आणि ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील त्यांच्या मूळ भूमीत राहू शकतील. तथापि, त्यांच्या आशा लवकरच धुळीस मिळाल्या.
ब्रिटिश सरकारने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापना जाहीर करताच लाहोरमध्ये जातीय हिंसाचार उफाळून आला. इस्लामिक जिहादी टोळ्यांनी शहरात लूटमार आणि खून सुरू केले. हिंदू आणि शीखांची घरे शिकार करून जाळण्यात आली. त्यांना दिसणाऱ्या कोणत्याही हिंदू किंवा शीखांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या डोळ्यांसमोर हिंसाचार घडताना पाहूनही प्राध्यापक ब्रिज नारायण त्यांच्या तत्त्वांवर ठाम राहिले. त्यांनी लाहोरला त्यांची मातृभूमी घोषित केली आणि ते सोडणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
लाहोरमध्ये दंगली पसरत होत्या. दरम्यान प्रा. ब्रिज नारायण यांच्या परिसरात एक जिहादाने उन्मादलेला एक जमाव आला ते जिहादी हिंदू आणि शीखांच्या रिकामी घरे लुटत होते आणि जाळत होते. हिंसक जमावाने “अल्लाह ओ अकबर” असे घोषणा दिल्या तरीही, ब्रिज नारायण यांना काही फरक पडला नाही. वेगळ्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मागणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे याचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे तेथील मुस्लिम नक्कीच त्यांचा आदर करतील अशी त्यांना ठाम खात्री होती.
प्रा. ब्रिज नारायण निर्भयपणे त्या जिहादी जमावाजवळ गेले आणि त्यांनी जाहीर केले की ही मालमत्ता आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आहे आणि त्यांनी ती नष्ट करू नये. त्यांच्या शब्दांचा परिणाम झाला आणि जिहादी पांगले पण ही शांतता अल्पकाळ टिकली.

थोड्याच वेळात आणखी एक जिहादी गट आला प्रा. ब्रिज नारायण यांनी पुन्हा त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्यांचा आवाज दबला गेला. गर्दीतील कोणीतरी ओरडले “तो काफिर आहे, त्याला मारून टाका!”
हे ऐकताच शेकडो जिहादींच्या कट्टर जमावाने प्रा. ब्रिज नारायण यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या घरासमोरच त्यांना तलवारीने निर्घृपणे खांडोळी करून ठार मारले. हत्येनंतर त्यांचे घर लुटण्यात आले आणि त्याला आग लावण्यात आली. त्यांच्या कष्टाने कमावलेल्या ग्रंथालयाचीही राख झाली. तो दिवस होता १४ ऑगस्ट १९४७. प्रा. ब्रिज नारायण यांच्या स्वप्नातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीचा आणि स्वातंत्र्याचा. कायदे आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना का कुत्ता ना हिंदुओं का रहा ना जिहादियों का रहा आखिर कुत्ते की मौत मारा गया।

मित्रा दीपक कश्यप… प्राध्यापक ब्रिज नारायण यांची करूण कहाणी इथे फक्त उदाहरणापूरती दिली आहे. त्यांच्यासारखे योगेन्द्र नाथ मंडल, दिवाण बहाद्दूर सिंघा न जाणो स्वतःला “धर्मनिरपेक्ष” म्हणवणारे “सर्वधर्म समभाव” मानणारे “भाईचारा” जोपासणारे किती इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेमी हिंदू (काफीर) पता नहीं कहां है वे,अतीत में समा गए… कारण शेवटी कितीही झालं तरी तू त्यांच्यासाठी काफीरच आहेस. आणि म्हणून कुत्र्याच्या मौतीने मरण्याच्या लायकीचा आहेस. तुझ्या “दीपक मोहम्मद” नावातील मोहम्मद त्यांना कधीच सुखावणार नाही. पण “दीपक” मात्र बोचत राहील. कारण तू काफीर दीपक कश्यप आहेस हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
आज तुझ्या कोटद्वारमध्ये २५ हजार हिंदू आणि १० हजार मुसलमान आहेत. ज्या दिवशी या आकड्यांची अदलाबदल होईल त्या दिवशी तुझ्या “मोहब्बत की दुकान”च्या जागी एखादे “मोहम्मद की दुकान” उघडलेले असेल आणि दीपक विझलेला असेल. १,४०० वर्षांच्या इतिहासाची साक्ष हेच सांगते. दीपक विझताना त्याच बजरंग दलाच्या त्याच कार्यकर्त्यांना साद घालायला विसरू नकोस. ते नक्की धावत येतील कारण त्यांनाही माहित आहे. शेवटी कितीही झालं तरी तू दीपक कश्यप आहेस. आमच्यासाठी प्राणप्रिय हिंदु समाजाचा अविभाज्य घटक. बाकी तोपर्यंत चालू दे तुझी “दीपक मोहम्मद” ची थेरं…