Monday, November 25, 2024

राज ठाकरेंमुळे महायुतीला बळ मिळालं

Share

महाराष्ट्र : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (दि.१५ मे, बुधवार)) भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या.

दरम्यान, 17 मे रोजी मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकाच मंचावर येत आहेत. सभेसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले “राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला निमंत्रित करायला आलो आहे. राज ठाकरेंनी निमंत्रण मान्य सुद्धा केलं आहे. राज्यातील एकंदरीत निवडणूक आणि पाचव्या टप्प्यातील निवडणूकामध्ये राज ठाकरेंचा महत्वाचा वाटा राहिला आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.  

दरम्यान, “मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याची भूमिका राज ठाकरेंनी केलीये. त्यांना भेटून आभार मानले. मुंबई, नाशिक मधील निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची आहे. ज्याप्रकारे पुण्यामध्ये (Pune) आवाहन केलं त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा आम्हाला झालेला आहे. राज ठाकरेंच्या एकंदरीत भूमिकेमुळे महाराष्ट्रात भाजपाला आणि महायुतीला बळ मिळालं आणि पुढे सुद्धा त्यांचे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे”, असं ते यावेळी म्हणाले.  

यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. “काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही हि देशातील स्थिती आहे. २४० जागा लढवणारी काँग्रेस कसकाय प्रधानमंत्री पदाचा विचार करू शकते?”,  असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.

अन्य लेख

संबंधित लेख