रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे . या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी २६९ चौरस फूट घरकुल उपलब्ध करून दिलं जातं.
या रमाई आवास योजनेचे निकष
1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे. ज्या लाभार्थ्यांचे वास्तव्य महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त आहे असे अनुसूचित जाती व अनुभव उद्योग घटकातील लाभार्थी रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात
2)लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याचे पक्के घर नसावे
3) लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या बाहेरील असावा
रमाई आवास योजना अंतर्गत आपल्याला घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं :
1)ग्रामीण भागासाठी 1 लाख 32 हजार रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते
2)त्यानंतर डोंगरावर नक्षलवादी भागातील लाभार्थ्यांसाठी 1 लाख 42 हजार रुपये अनुदान दिले जाते
3)यात शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाते .
आपण जर अनुसूचित जाती व नवोदय घटकातील लाभार्थी असाल तर आपण रमाई आवास योजना अंतर्गत घरकुलासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्ज करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण आपल्या ग्रामपंचायतीमधून यासाठी अर्ज करू शकता शहरी भागामध्ये आपण असाल तर नगरपालिका कडे अर्ज करू शकतात.