Friday, September 20, 2024

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें

Share

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.

महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख