कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना 2 ऑगस्ट, 2024 रोजी कोलंबो (Colombo) येथे सुरू होईल. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात दिसणार आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीममधील उत्कृष्ट फलंदाज विराट कोहली यांचे पुनरागमन भारतीय संघाला अधिक बाळ मिनार आहे यात काही शंका नाही. परंतु, या सामन्यावर पावसाची सावली असल्यामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनासमोर विकेटकीपरच्या भूमिकेसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यात निवड करण्याची कठीण समस्या आहे. तसेच, युवा खेळाडू रियान पराग याच्या पदार्पणाची शक्यता असल्यामुळे हा सामना अधिक रोमांचक ठरणार आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी सामन्याची वेळ दुपारी २:३० वाजता आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय सामने असणार आहेत, ज्यामुळे दोन्ही संघांना आपले कौशल्य दाखवण्याची आणि मालिकेत विजय मिळवण्याची संधी मिळणार आहे.
- 27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार
- पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर
- ‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन
- अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली
- पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश