Saturday, October 26, 2024

गौतम अदानी यांची निवृत्ती कडे वाटचाल

Share

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होण्याच्या आणि 2030 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांच्या समुहाचे नियंत्रण त्यांच्या मुलांवर आणि त्यांच्या चुलत भावांकडे हस्तांतरित करण्याची त्यांची योजना उघड केली आहे.

ब्लूमबर्ग न्यूजच्या मुलाखतीदरम्यान ही घोषणा गौतम अदानी यांनी केली , जिथे अदानी यांनी सहजतेने आणि पद्धतशीर उत्तराधिकार निवडीची प्रक्रिया व्हावी असे मत व्यक्त केले . अदानी समूहाच्या भवितव्याबद्दल विचारले असता, 62 वर्षीय गौतम अदानी यांनी सांगितले “मी निवड दुसऱ्या पिढीवर सोपवली आहे कारण हि प्रक्रिया सहज आणि अतिशय पद्धतशीर असावी .”

अदानीचे दोन मुलगे करण आणि जीत, त्यांचे चुलत भाऊ प्रणव आणि सागर यांच्यासह त्यांचे कुटुंब ट्रस्टचे समान लाभार्थी बनतील आणि एकत्रितपणे व्यवसाय चालवतील. ज्याचे उद्दिष्ट अदानी समूहाची निरंतर वाढ आणि यशाची सुनिश्चित आणि समस्यांचे निराकरण करणे आहे.

रोखे बाजारातील 10 नोंदणीकृत कंपनींच्या आधारे अदानी समूह $213 अब्ज डॉलर्सच्या एकूण उलाढाल करते . अदानी समूह भारताच्या आर्थिक वाढीला सामर्थ्य देते. समूहाच्या वैविध्यपूर्ण कंपनींमधे बंदरे, लॉजिस्टिक, ऊर्जा, संरक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रातील व्यवसायांचा समावेश आहे.

गौतम अदानी यांच्या निवृत्ती आणि उत्तराधिकार योजनेची घोषणा अदानी समूहाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि नेतृत्व आणि वाढीच्या नवीन युगाचा टप्पा सेट करते.कंपनीने पुढील पिढीच्या समुहाला सतत वाढ आणि समृद्धीकडे नेण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख