Wednesday, January 15, 2025

रक्षाबंधन : अर्थ , अन्वयार्थ.

Share

रक्षाबंधन सण! आमच्या हिंदू समाजात कुठलेही सण, कुठल्या परंपरा अनाहुत निर्माण झाल्या नाहीत. दुर्दैवाने त्या परंपरांचे महत्व आणि कारण न समजल्याने आम्ही आत्मविस्मृत झालो आणि म्हणून आम्ही रोज आमच्या भगिनी , कन्या गमावत आहोत. त्यांच्यावर होणारे अत्याचार बघत आहोत.

तात्पुरते candle light मोर्चे, थोडीशी हळहळ सगळे कसे स्मशान वैराग्य असल्यासारखे. जीवन क्षणभंगुर आहे असे स्मशानात वाटू लागते बाहेर आल्यावर प्रत्येक गोष्ट उपभोगण्याची इच्छा अमरत्व प्राप्तीचा ध्यास लावते.

आमचे असेच चालू आहे. वर्षा मागून वर्षे जात आहेत आमच्या भगिनी मुस्लिमांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. मोहम्मद बिन कासिम पासून सुरू झालेली ही राक्षसी परंपरा कासिम पठाण पर्यंत येवून पोहचली पण थांबायचे नाव घेत नाही. पूजा पवार , यशश्री शिंदे , श्रद्धा वालावलकर ही अलीकडील उदाहरणे पण प्रत्येक जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त लव्ह जिहाद केस आहेत.

मुस्लिम समाजात स्वतःला इस्लामिक स्कॉलर समजणारे कधीच यावर विचार करणार नाहीत. स्त्री हा एक उपभोग्य पदार्थ असाच विचार प्रस्तुत होत असेल तर मग त्याचे बळी आमच्या हिंदू भगिनी होणे स्वाभाविक आहे. देशाच्या फाळणी प्रसंगी हेच झाले. आम्ही आमची भारत माता खंडित करून शांतता , स्वातंत्र्य मागितले. त्या वेळच्या नेत्यांना असे वाटले एकदाचे देवून टाका , उरलेला भाग तरी शांत होईल ? पण हे संपतच नाही .

मॉ जिजाबाई यांनी बाल शिवबा मधून छत्रपती शिवराय घडवले ते आपली गोमाता सुरक्षित नाही , आपली मंदिरे उध्वस्त होत आहेत आणि आपली आया बहिणींची अब्रू रोज लुटली जाते आहे त्यांच्या संरक्षणासाठी ! त्यावेळी छत्रपतींना विरोध करणारे सूर्याजी पिसाळ , रांझ्याचे पाटील होतेच. आज परिस्थिती वेगळी नाही . समस्या त्याच आहेत. असुरक्षितता सर्वत्र आहे. आमच्या भगिनीची सामाजिक सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह घेवून हा रक्षाबंधन सण आला आहे.

सर्वप्रथम द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण याना एक चिंधी बांधली होती , श्रीकृष्णाने दुर्योधन , दू: शासन यांच्या पासून द्रौपदीचे संरक्षण केले. पुढे ती परंपरा भाऊ आणि बहीण यांच्या नात्याचे एक उदात्त रूप बनले. स्त्रीचे , बहिणीचे संरक्षण ती अबला म्हणून नव्हते करायचे, वेळ आली तर ती स्वतःचे संरक्षण स्वतः करायची पण ! याची अनेक उदाहरणे आहेतच. परंतु सामान्य मानवी संस्कृतीतील एक उदात्त सामाजिक भावनेचे प्रतीक म्हणजे रक्षा बंधन परंपरा होती.

पण आज ह्या आमच्या भगिनीचे संरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे. कारण त्यांचे भाऊ आज आपआपसात जातीवरून भांडणात एव्हढे व्यग्र झाले आहेत की त्यांना हे लक्षात येतच नाही की यशश्री शिंदे किंवा पूजा पवार आमच्या घरात घडू शकेल ! हे वास्तव त्यांना कळते तो पर्यंत उशीर झालेला असतो.

काल पूजा पवार नावाची १० वीतली कोवळी पोर जीव गमावून बसली. कुणा कासिम नावाचा राक्षस तिच्या दुर्दैवाने तिला आयुष्यात कुठून आला माहीत नाही , पण पोर जीवन संपवून बसली. यशश्री शिंदें चा तर गिधाडे किंवा राक्षस सुद्धा ज्या क्रौर्य पाहून लाजतील अशा पद्धतीने खून झाला. त्या आधी श्रद्धा वालावलकर झाली .

मशिदीतून फतवे काढून व्होट जिहादच्या माध्यमातून सत्तेचे हाडके चघळू पाहणारी महाराष्ट्रातील राजकीय भूतावळ यावर काही बोलणार नाही . बाकीच्यांचे जाऊ द्या ज्या घराण्याने महाराष्ट्रातील हिंदू विचाराला , हिंदू तरुणाला आज पर्यंत भ्रमित केले त्यांचे आजचे राजकीय वारसदार आणि त्यांचा तो आचरट प्रवक्ता निर्लज्ज होवून वफ्फ बोर्डाची तरफदारी करतात आणि अशा प्रकरणात मिठाची गुळणी धरुन ‌बसतात तेंव्हा मन संतप्त होवून जाते.

दुसरीकडे जे सत्तेत आहेत त्यांना हिंदुत्वाच्या फक्त गप्पा मारून सत्तेत राहता येणार नाही त्यासाठी हिंदू समाजाला सुरक्षित वाटेल असे वायू मंडळ निर्माण करावे लागेल. योगी आदित्यनाथ यानी जे करून दाखवले ते अनुकरणीय आहे . यासाठी बरोबर घेतलेल्या कोणाची गैरसोय होणार असेल , कुणी अस्वस्थ होणार असेल तर ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या राजकीय भविष्याचा विचार करावा . हिंदुत्वाच्या बाबतीत तडजोड भविष्यात विनाशाकडे नेवू शकते.

अत्याचारित मुलगी कुठल्या जातीची आहे ? हा प्रश्न विचारुन जातीय तेढ निर्माण केली जाते .पण धार्मिक तेढ मान्य नसते. तेंव्हा अशा वृत्तीला धर्म नसतो हे ह्या सगळ्या निर्भय बानो च्या ठेकेदरांची भूमिका असते. ह्या सगळ्या ना हिंदू उत्सवाची सार्वजनिक टिंगल टवाळी करायची असते. वैयक्तिक आयुष्यात सर्व धार्मिक कर्म कांडे पाळत हिंदू समाजातील उत्सव , सण यातील सामजिक आशय संपवून टाकण्याचा जो उद्योग केला त्यातून संपूर्ण समाजात बेबंदशाही पसरण्याची वेळ आली आहे.

पूजनीय रामगिरी बाबा यांच्यावर पोलिस कारवाई करावी म्हणून निवेदन देणारे कोण आहेत ? काँग्रेस चे पैठणचे तालुका अध्यक्ष! त्यांचे दिल्लीतील उमराव मोहबत चे दुकान उघडुन प्यार वाटत फिरत आहेत. त्या दुकानातील मोहब्बत कासिम , दावूद फुकटात घेतात आणि आमच्या पोरी मारतात. हिंदू समाज याबद्दल या राजकीय पक्षांना जाब विचारणार का ? रक्षा बंधन सण आम्हाला हा प्रश्न विचारत आहे.

वारी मध्ये अनाहुत पणे छुप्या पद्धतीने घुसणारे टोपी घालून सेवेचे नाटक करणारे , आरक्षणाच्या आंदोलनात मराठा , ओबीसी दोघांना पाठिंब्याचे नाटक करणारेच , आमच्या पूजा पवार , यशश्री शिंदेचे मारेकरी आहेत. ही तीच उद्दाम‌ वृत्ती आहे जी ७७ वर्षाच्या एखाद्या महिलेची अंतर्वस्त्रे उन्मादी पणे हवेत टीव्ही समोर फडकवत आपला विजय साजरा करते. ती सर्वदूर एक आहे. कारण मूलतः काही विचारामुळे ही वृत्ती निर्माण झाली आहे. अशा वृत्तीला रोखण्याचे आव्हान ह्या रक्षा बंधनाच्या निमित्ताने आमच्या समोर आहे.

या रक्षा बंधन सणाचे आव्हान खूप मोठे आहे. आम्ही व्यक्तिगत रित्या आमच्या उत्सवात , यात्रा / जत्रा यात मश्गूल आहोत. राजकारणात मग्न आहोत. आत्ममग्न होत आहोत. यातून येणाऱ्या आव्हानांची आम्हाला कुठल्याही प्रकारची जाणिव नाही असे कधी कधी वाटते.
आरक्षणाचे आंदोलन करते मुस्लिम समूहाच्या आरक्षणाची मागणी करतात तेच तुमच्या बहिणीचे सर्वस्व हिरावून घेतात. हा दैवदुर्विलास कधी तरी समजून घ्यावा लागेल.संरक्षण हे आरक्षणा इतकेच किंबहुना त्या पेक्षा महत्वाचे नाही का ? कुणी असित्वावरच घाला घालणारे असतील तर छत्रपतींची नीती आम्हाला काय शिकवते ? का महाराज फक्त पुतळा आणि प्रतिमेच्या रुपात ठेवायचे आहेत ? कुठला प्रश्न कधी आणि किती मोठा समजायचा? या सर्व प्रश्नांचा बोध घेण्यासाठी हे रक्षा बंधन आहे.

कलकत्त्यात एका डॉक्टर मुलीवर झालेले अत्याचार अंगावर शहारे आणणारे आहेत. महिला अत्याचाराचा हा परमोच्च बिंदू आहे. हे कृत्य करणारे पण डॉक्टर आहेत. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी सर्रास पणे वावरणे , नोकरी च्या ठिकाणी येणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का ? स्वातंत्र्याने स्वैराचाराची जागा कधी आणि कशी घेतली ? या स्वैराचारी वृत्तीला विरोध करायचा की नाही ? असे अनेक प्रश्न घेवून हे रक्षाबंधन आले आहे.

सत्ता , अर्थकारण आणि सामाजिक गुन्हेगारी , मुस्लिम अनुनय यातून आमचा बंगाल एका ज्यालामुखीच्या उंबरठयावर उभा आहे. रामकृष्ण परमहंस , ईश्र्वरचंद्र विद्यासागर , रवींद्रनाथ टागोर यांची वंगभूमी , ही मानवी मूल्यांच्या साठी भंग भूमी झाली आहे. ममता बॅनर्जी सरकार का अराजक निर्माण करत आहे ? जया अमिताभ बच्चन ह्या विषयात का गप्प आहे ? हा केवळ राजकीय प्रश्न आहे का ? असे सारे प्रश्न ह्या रक्षा बंधन उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत!

आता पुन्हा स्वामी विवेकानंद , सावरकर , डॉ. हेडगेवार जन्म घेणार नाहीत. आता आपणच हे सगळे बनले पाहिजे. आता आपणच राम , लक्ष्मण बनून सीता हरण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. राजकारणाच्या सरिपटावर कुणी आमच्या बहिणींना पणाला लावणार असेल तर आता आम्हाला प्रत्येकाला श्रीकृष्ण बनून आजच्या जिहादी वृत्तीला बळी पडणाऱ्या द्रौपदीला वाचवावे लागेल.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही याचा विचार करणार का हा खरा प्रश्न आहे !

रवींद्र मुळे.
अहिल्यानगर.

अन्य लेख

संबंधित लेख