Sunday, July 6, 2025

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश

Share

रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री मारली आहे. त्याच्या पत्नीच्या पाठोपाठ आता जड्डू देखील राजकारणात सक्रिय झाला आहे . तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.

जड्डू अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. त्यांनी अनेक रोड शो देखील केले आहेत. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबाने पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे. खरे तर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

अन्य लेख

संबंधित लेख