Thursday, September 19, 2024

राहुल गांधींनी भारतीय संविधानाचा अपमान केला; विखे पाटीलांचे आरोप

Share

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा (Constitution) अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला असल्याची प्रतिक्रीया राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, ‘खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला,’ असल्याच त्यांनी बोललं आहे.

‘यापूर्वी परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीच्या विरोधातील वक्तव्य असो की, संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीतील अध्यादेश फाडणे असो, एकप्रकारे काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमानच केला होता,’ असा आरोप त्यांनी त्यांनी केला.

‘आता थेट आरक्षणाच्या विरोधातील वक्तव्याने काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणारे आता जनतेला समजले आहेत,’ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘आरक्षण रद्द करण्याचे त्यांचे वक्तव्य संविधानाचा अपमान करणारे आणि जनतेचा हक्क, अधिकार हिरावून घेणारे आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सदैव अपमान करणाऱ्या काँग्रेसची भूमिकाच संविधान बदलाची दिसते.’ असा आरोप त्यांनी यावेळी केला.

अन्य लेख

संबंधित लेख