Sunday, October 20, 2024

प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 992 विशेष रेल्वे गाड्या

Share

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे मंत्रालय 992 विशेष गाड्या
चालवणार आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, मंत्रालयाने प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण आणि
अपग्रेड करण्यासाठी 933 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. तसेच, प्रयागराज विभाग आणि आजूबाजूच्या भागात गाड्यांची सुरळीत वाहतूक करण्यासाठी 3,700 कोटी रुपये खर्चून ट्रॅकचे जलद दुहेरीकरण केले जात आहे. यावेळी कुंभासाठी 30 ते 50 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने प्रयागराजसाठी विविध शहरांमधून 6,580 नियमित गाड्यांव्यतिरिक्त एक हजार विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वत: नियमितपणे व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. वैष्णव यांनी 28 सप्टेंबर रोजी रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि व्ही सोमन्ना यांच्यासोबत आढावा बैठक झाली. त्यानंतर आता रेल्वे विभागही कामाला लागला असून नियोजनाच्या दृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख