Friday, October 18, 2024

तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे सरकारचे आहे खास लक्ष

Share

तीर्थक्षेत्रे म्हटले की तेथील देव – देवस्थानाबरोबरच तेथील अस्वच्छता, असुविधा यामुळेदेखील ती ओळखली जातात. परंतु सन२०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भा.ज.पा.च्या सरकारने व महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष दिले आहे, त्यामुळे भारतभरातील व महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे बदलले आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगी गडावरील वणी या तीर्थक्षेत्राचे रूप पालटले आहे.

महायुती सरकारने या तीर्थक्षेत्रासाठी काय केले?
सप्तशृंगी गडावर वणीच्या परिसर विकासासाठी सरकारने ८१ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाचे विशेष पॅकेज डिसेंबर २३ मध्ये मंजूर केले आणि हा सर्व निधी योग्य त्या ठिकाणी आणि व्यवस्थित कामे होण्यासाठी खर्च व्हावा म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

या निधीतील केलेली व करावयाची कामे-

  •  नांदुरी* येथील भक्त निवास (८ कोटी ५१ लाख),
  • पोलीस स्टेशनच्या विकासासाठी (७ कोटी ७१ लाख ४१ हजार), 
  • बस स्थानकाच्या विकासासाठी ( ५ कोटी ५० लाख ) 
  • गावातील संपूर्ण वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ( ५ कोटी ४४ लाख ४१ हजार ) 
  • रस्ते व गटारी साठी (४ कोटी ५९ लाख ४१ हजार ) ,
  • दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी त्याचा प्रतिबंध करण्यासाठी (१ कोटी ९२ लाख), 
  • जनतेच्या सोईसाठी नक्षत्र बगीचा प्रकल्पासाठी ( १ कोटी ८३ लाख ५० हजार) 
  • स्वच्छता गृहांची पूर्तता करण्यासाठी (१ कोटी ५२ लाख ३४ हजार ) 
  • गडावर डोम, हाय मास्ट इत्यादीसाठी (३ कोटी ९१ लाख ५० हजार )  
  • वन विभागाच्या जमिनीवर विविध कामांसाठी (४ कोटी ३७ लाख ८२ हजार ) 
  • अशी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे ,हे सर्व पहाता विद्यमान सरकार हिंदू धार्मिक स्थळांसाठी

    अतिशय योग्य दिशेने आणि सकारात्मक पद्धतीने कार्य करीत आहे.

श्री.रमाकांत मंत्री
मनमाड

अन्य लेख

संबंधित लेख