राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.
निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध शुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अमित शाहांसोबत चर्चा केल्यानंतर संपूर्ण जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.