Friday, October 18, 2024

अरे वा! हा बोर्ड गायब झाला

Share

आपण एस.टी. स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर, बागेमध्ये, महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर हा बोर्ड नक्कीच पाहिला असेल. हा बोर्ड जागोजागी दिसायचा. या बोर्डकडे पाहून भीतीही वाटायची. सार्वजनिक ठिकाणी आपण किती असुरक्षित आहोत, आपला देश किती असुरक्षित आहे याची जणू हा बोर्ड जाणीवच करून द्यायचा अन सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकात असूनही आपण एकटे असल्याची जाणीव व्हायची.

हा बोर्ड जसा दिसायचा तसा रेल्वे स्टेशनवर, एस.टी.स्टँडवर अगदी विमानतळावरही आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सण – समारंभात देखील नक्कीच हे निवेदन देखील आपल्या कानावर पडायचे आणि आपल्या पोटात भीतीचा गोळा उभा राहायचा.

सन २०१४ पासून हा बोर्ड अचानक गायब झाला, निवेदन देखील आता कुठे कानावर पडताना दिसत नाही.

“अरे वा! हा बोर्ड गायब झाला” असे आपण आता आनंदाने म्हणू शकतो.

कुणी केला हा बोर्ड गायब?
सन २०१४ मध्ये देशात आलेल्या राष्ट्रवादी विचारांच्या मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या सरकारने व महाराष्ट्रात मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या महायुती सरकारने अनेक अशा गोष्टी केल्या, की त्यामुळे हा बोर्डही गायब झाला आणि निवेदनही कानावर पडायचे बंद झाले.

काय केल्या अशा गोष्टी?

  • नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगभरात अनेक देशांना भेटी देऊन त्या देशाचे समर्थन मिळविले, या समर्थनाच्या बळावर या देशांमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या आंतकवाद्यांना रोखण्याचे काम केले.
  • अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देशाला उध्वस्त करण्याचा कट रचणाऱ्यांना सरकारने वेळीच आवर घातला, 
  • अशा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यामध्ये सरकार यशस्वी झाले. 
  • अशा कारवायांमध्ये गुंतलेल्यांना सरकारने शोधून योग्य ते शिक्षा केली. 
  • परकीय घुसखोरांचा बंदोबस्त करत असतानाच देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील सरकारने धडा शिकविला.
  • देश विघातक कारवाया करणाऱ्यांचा बुरखा फाडला.
  • संरक्षण मंत्री या नात्याने मा.श्री.राजनाथसिंह व गृहमंत्री या नात्याने मा.श्री.अमित शहा यांनी खंबीर भूमिका घेऊन अनेक गोष्टी केल्या. 
  • सैनिकांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन आधुनिक शस्त्रास्त्रे मिळवून दिली.
  • स्वदेशी शस्त्रास्त्रे निर्माण करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले.
  • महाराष्ट्रासारख्या राज्यात श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने कणखर भूमिका घेतली.
  • महाराष्ट्राच्या कायदा – सुव्यस्थेमध्ये प्रचंड सुधारणा घडवून आणल्या. 
  • देश माझा आहे ही भावना मा.श्री.नरेंद्र मोदी व मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून निर्माण केली, त्यामुळेच समाज जागृत झाला – सजग झाला हे पाहून देश विघातक कारवाया करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

म्हणूनच देशात व महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सक्षम झाल्याचा पुरावा म्हणजेच हा बोर्ड गायब झाला.

आता आपला देश अधिक सुरक्षित झाला आहे तुलनेने महाराष्ट्र राज्य आणखी सुरक्षित झाले आहे. देशाला व राज्याला सुरक्षित ठेवणारे आपले सरकार – आपल्या माणसांचे सरकार आहे. 

खरोखरच नरेंद्र मोदी यांच्या हातात देश तर देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे. तो आणखी सुरक्षित करूया. आपण आपल्या माणसांना बळ देऊया.

डॉ. सचिन वसंतराव लादे
पंढरपूर

अन्य लेख

संबंधित लेख