Friday, October 18, 2024

प्रविण दरेकर यांचं मनोज जरांगे यांना खुलं आव्हान; जरांगे यांनी निवडणूक लढवावी आणि…

Share

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना निवडणूक लढवण्याचं खुलं आव्हान देत भाजपचे नेते, आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कारण जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असून त्यांच्या हालचालींनी राज्यातील राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा आहे, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना रोखत आहेत, असा गंभीर आरोप केला होता.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले, “आपण भाजपाचे उमेदवार बघून टार्गेट करण्याचे नियोजन, ही खेळी समजण्या इतका महाराष्ट्र दूधखुळा राहिलेला नाही. जर खरंच तुमच्यामध्ये धमक असेल, तर तुम्ही स्वतः निवडणूक लढवा. उमेदवार उभे करा. सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावं. किंवा विशिष्ट संख्येत आमदार निवडून आणून सरकारला विधिमंडळात विषय मार्गी लावण्यासाठी भाग पाडावं,” असं खुलं आव्हान दरेकर यांनी दिलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख