Monday, October 28, 2024

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

Share

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर केले नसल्यामुळे उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे.

दुसरीकडे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आज अर्ज दाखल करण्याचं वृत्त आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं येत्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळमध्ये सिद्धी कदम, परळीत राजेसाहेब देशमुख, चिंचवडमध्ये राहुल कलाटे, भोसरीत अजित गव्हाणे, करंजा विधानसभेसाठी ज्ञायक पटणी, हिंगणघाटमध्ये अतुल वांदिले, हिंगणामध्ये रमेश बंग, अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद, माझलगाव इथं मोहन जगताप आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.

“महाविकास आघाडीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ज्या जागा आल्या आहेत. त्यातील एकूण उमेदवारांपैकी आम्ही आमच्या यादीत एकूण ११ महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्हाला याचा आनंद आहे.” जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर केली.

अन्य लेख

संबंधित लेख