Wednesday, January 22, 2025

दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ६.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे विक्रमी ३१ करार

Share

दावोस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) मंगळवारी अवघ्या एका दिवसात तब्बल ६ लाख २५ हजार ४५७ कोटींच्या गुंतवणुकीचे ३१ सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

दरम्यान, यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. राज्याच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. वेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

21 जानेवारी 2025 झालेले सामंजस्य करार

MOU स्वाक्षरी : 31

एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : ५२०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १६,५०० कोटी
रोजगार : २४५०
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १७,००० कोटी
रोजगार : ३२००

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १२,००० कोटी
रोजगार : ३५००
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : ७५० कोटी
रोजगार : ३५
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : ३,००,००० कोटी
रोजगार : १०,०००
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : ३०,००० कोटी
रोजगार : ७५००
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १००० कोटी
रोजगार : ३००
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : २००० कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : १०००
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

12) व्हीआयटी सेमिकॉन
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : २४,४३७ कोटी
रोजगार : ३३,६००
कोणत्या भागात : रत्नागिरी

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : ४००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : १०,५२१ कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

15) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : २५० कोटी
रोजगार : ६००
कोणत्या भागात : एमएमआर

16) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १०,७५० कोटी
रोजगार : १८५०
कोणत्या भागात : पुणे

17) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : १७,५०० कोटी
रोजगार : २३,०००

18) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : ३५०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : पुणे

19) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ८००० कोटी
रोजगार : २०००

20) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : १७०० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

21) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : ८५०० कोटी
रोजगार : १७,३००

22) टाटा समूह
क्षेत्र : अनेक
गुंतवणूक : ३०,००० कोटी

23) सीएट
क्षेत्र : ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही
गुंतवणूक : ५०० कोटी
रोजगार : ५००

24) ग्रामीण संवर्धक
क्षेत्र : रूग्णालयांसारख्या सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी
गुंतवणूक : १०,००० कोटी

25) पॉवरिन उर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,२९९ कोटी
रोजगार : ४०००

26) ओपन ओरिजिन इंडिया इंक
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,००० कोटी
रोजगार : १०००

27) युनायटेड फॉस्फरस लि
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ६,५०० कोटी
रोजगार : १३००

28) एरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक : २०,००० कोटी
रोजगार : २०,०००

29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही
गुंतवणूक : ३००० कोटी
रोजगार : १०००

30)

31)

सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरसारख्या क्षेत्राला जागतिक गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून मान्यता मिळत आहे. हे महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक गुंतवणुकीचे ठिकाण बनविण्याच्या दृढतेचे प्रतीक आहे. यासोबतच, छत्रपती संभाजीनगरसारखा प्रदेश केवळ आर्थिक प्रगती करत नाही, तर जागतिक स्तरावर स्वतःची ठसा उमटवत आहे. हा करार नव्या युगाची सुरुवात आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि नवकल्पनांना चालना मिळेल. परिणामी, येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.

अन्य लेख

संबंधित लेख