Thursday, January 23, 2025

नांदेडहून प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुरुवात; खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

Share

नांदेड : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी (Mahakumbh, Prayagraj) नांदेडहून (Nanded) विशेष रेल्वेगाड्यांची (Trains) सुरुवात करण्यात आली आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr.Ajeet Gopchade) यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मागणीला मंजुरी दिली आहे. या विशेष गाड्यांद्वारे हजारो भाविकांना महाकुंभमेळ्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाड्या प्रयागराज छिवकी मार्गे चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा विशेष रेल्वेगाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 11:00 वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापूर मार्गे प्रवास करून तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पटणा येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष रेल्वेगाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि त्याच मार्गाने प्रवास करून नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 4:30 वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण 22 डब्बे असतील.

गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा (मार्गे नांदेड) ही विशेष गाडी काचीगुडा स्थानकावरून 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4:45 वाजता सुटेल. ही गाडी निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापूर मार्गे प्रवास करून तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पटणा येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा (मार्गे नांदेड) ही विशेष गाडी पटणा स्थानकावरून 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच प्रवास करत काचीगुडा येथे सकाळी 7:00 वाजता पोहोचेल.

विशेष गाडी सेवा: नांदेड-पटणा आणि पटणा-नांदेड मार्गावर

गाडी क्रमांक 07099, नांदेड ते पटणा विशेष गाडी, 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता नांदेड येथून सुटेल. ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, आणि दानापुर या स्थानकांवर थांबत पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07100, पटणा ते नांदेड विशेष गाडी, 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता पटणा येथून सुटेल. ही गाडी वरीलच मार्गाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 4.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील, जे प्रवाशांसाठी सोयीस्कर सेवा देतील.

विशेष गाडी सेवा: औरंगाबाद-पटणा आणि पटणा-औरंगाबाद मार्गावर

गाडी क्रमांक 07101, औरंगाबाद ते पटणा विशेष गाडी, 19 फेब्रुवारी 2025 आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता औरंगाबाद येथून सुटेल. ही गाडी जालना, सेलू, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, आणि दानापूर या स्थानकांवर थांबत पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07102, पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी, 21 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता पटणा येथून सुटेल. ही गाडी वरीलच मार्गाने औरंगाबाद येथे 23 फेब्रुवारी 2025 आणि 29 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.45 वाजता पोहोचेल.

या गाडीत 22 डब्बे असतील, जे प्रवाशांसाठी सोयीस्कर सेवा देतील.

गाडी क्रमांक 07103, काचीगुडा ते पटणा विशेष गाडी, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:45 वाजता काचीगुडा स्थानकावरून सुटेल. ही गाडी निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, आणि दानापूर या स्थानकांवर थांबत पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07104, पटणा ते काचीगुडा विशेष गाडी, 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पटणा स्थानकावरून सुटेल. ही गाडी वरीलच मार्गाने काचीगुडा येथे 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

गाडी क्रमांक 07105, सिकंदराबाद ते पटणा विशेष गाडी, 07 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता सिकंदराबाद स्थानकावरून सुटेल. ही गाडी निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, आणि दानापूर या स्थानकांवर थांबत पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07106, पटणा ते सिकंदराबाद विशेष गाडी, 09 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पटणा स्थानकावरून सुटेल. ही गाडी वरीलच मार्गाने सिकंदराबाद येथे 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील.

खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी प्रयागराज येथील महा कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या हिंदू भाविकांना या विशेष रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नांदेड येथून प्रयागराज महाकुंभमेळा जाणाऱ्या विशेष रेल्वेच्या सोडणीसाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख