Saturday, July 5, 2025

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Share

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ‘स्टडी इन महाराष्ट्र’ (Study in Maharashtra) उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

मंत्रालयात ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर,महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक,उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव संतोष खोरगडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये NRI/OCI/PIO/CIWGC/FNS प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रवेशासाठी ही इंटिग्रेटेड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होतील आणि मानवी हस्तक्षेप कमी होऊन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाईल. या अभिनव उपक्रमाचे उद्दिष्ट महाराष्ट्राला जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षणाचे जागतिक आणि पसंतीचे केंद्र बनवणे आहे.

या प्रणालीमुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आता डिजिटल झाली आहे. नोंदणीपासून ते अंतिम प्रवेशापर्यंतची सर्व प्रक्रिया – अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी – पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडेल, असेही त्यांनी सांगितले.

या सुविधेमुळे NRI/OCI/PIO/CIWGC/FNS उमेदवारांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे वेळ, प्रवास आणि खर्च वाचणार असून, ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम ठरेल. पोर्टलवर सर्व संबंधित महाविद्यालयांची माहिती, प्रवर्ग, पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती सहज उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, https://fn.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या.

अन्य लेख

संबंधित लेख