Monday, June 24, 2024

प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधताना दुर्दैवी घटना; बोट उलटून तीन SDRF जवानांचा मृत्यू

Share

अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत (Pravara River) पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे (SDRF) जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत ५ जण बुडाले. पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. यात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोघांचा शोध सुरु आहे.

काल नदीपात्रात दोन जण पोहण्यासाठी आले असता ते दोघेही बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरू होता. सकाळी सहा वाजेपासून एसडीआरएफच्या पथकाकडून शोधकार्य सुरु करण्यात आले. दुर्दैवाने एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली. यात पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाचा शोध घेतला जात आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी ही माहिती दिली.

अन्य लेख

संबंधित लेख