Thursday, October 24, 2024

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक सुरू

Share

पलक्कड : केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) अखिल भारतीय समन्वय बैठक सुरू झाली. ही बैठक 2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या बैठकीत वर्तमान परिस्थिती, महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह सहा सह-सरकार्यवाह आणि संघाचे इतर अखिल भारतीय अधिकारी समन्वय बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीत राष्ट्र सेविका समितीचे प्रमुख शांतका, प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष, सत्येंद्र सिंह, माजी सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष, ले. जनरल (निवृत्त) व्ही.के. चतुर्वेदी, ए. भा. ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नारायण भाई शहा, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार, सरचिटणीस बजरंग बगरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री आशिष चौहान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, संघटन महामंत्री बी.एल.संतोष, विद्या भारतीचे अध्यक्ष रामकृष्ण राव, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्म्य पंड्या, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ.राकेश पंडित, संघ प्रेरीत विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटना मंत्री आणि प्रमुख अधिकारी आणि सर्व संस्था च्या महिला प्रतिनिधींसह सुमारे 300 कार्यकर्ते उपस्थित होते.

ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदाच घेतली जाते. बैठकीच्या सुरुवातीला सर्व प्रतिनिधींना वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनाची आणि स्वयंसेवकांनी केलेल्या मदत आणि सेवा कार्याची माहिती देण्यात आली. बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते विनंती करून त्यांच्या कामाची माहिती व अनुभव यांची देवाणघेवाण करतील. याशिवाय राष्ट्रीय हिताचे विविध विषय, सद्य परिस्थिती, अलीकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाचे इतर आयाम आणि योजना यावर बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सर्व संघटना चर्चा करतील.

अन्य लेख

संबंधित लेख