Monday, October 13, 2025

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Share

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आणि अनेक नेते पक्षांतर करत असताना आता एका नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे वर्धा मतदारसंघातील खासदार अमर काळे (Amar kale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, हे खासदार अमर काळे यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, ही भेट वर्धा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात होती आई त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अमर काळे यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटले की, “‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्था (MGIRI) च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.”

https://twitter.com/amarkale_speaks/status/1958778842069504383

राजकीय चर्चांना उधाण
अमर काळे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पक्षांतराच्या चर्चा तापलेल्या असताना ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, काळे यांनी आपल्या पोस्टद्वारे ही भेट केवळ विकासकामांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, यामुळे शरद पवार गट आणि इतर राजकीय पक्षांमध्ये खलबतं सुरू झाली आहेत.

पुढे काय?
अमर काळे यांच्या या भेटीचा राजकीय परिणाम काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी त्यांनी विकासकामांना प्राधान्य दिल्याचे दिसते. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या अस्थिर वातावरणात अशा भेटी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. येत्या काळात याबाबत आणखी काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख