Thursday, October 10, 2024

कोल्हापुर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

Share

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे (BJP) नेते केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोल्हापुर येथे श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख