Monday, December 2, 2024

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

Share

अकोल्यातील भाजप पदाधिकारी तथा बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येउन हा चाकू हल्ला केल्याची माहिती आली आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता काल रात्री उशिरा त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केला.

दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे वाहन चालक आणि नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा त्यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडली. जमखी रामप्रकाश मिश्रा हे मुळ बिल्डर व्यावसायिक असून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. भाजपमध्ये रामप्रकाश मिश्रा ते उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. मिश्रा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचे मूळ कारण हे अद्यापपर्यंत समजलं नाहीय. याप्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करत आहेत. मिश्रा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षापोटी तर हा हल्ला झाला नाही ना? अशी शंकाही वर्तवली जात आहे.

रामप्रकाश मिश्रा यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुतळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख