अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिर संकुलात येणाऱ्या लाखो भक्तांसाठी अत्यंत परिपूर्ण व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. अशा व्यवस्था इथे आहेत की ज्या इतरत्र फार कोठेही आढळत नाहीत.
श्री रामलाला मंदिराचे भव्य बांधकाम आधुनिक तंत्रज्ञान आणि कारागिरांच्या कौशल्याच्या सहाय्याने करण्यात आले आहे. प्रत्येक खांबांवर आणि भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेली शिल्पे आहेत. त्याचप्रमाणे संकुलात सुंदर नक्षीकाम केलेली शिल्पे विलोभनीय आणि थक्क करणारी आहेत. आतील इतर बांधकामेही देखील कोणत्याही बाबतीत उणी नाहीत, ती बांधकामेही लक्षवेधी आहेत.
श्री रामलाला मंदिराच्या पश्चिम दिशेला स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. त्यांचे बांधकाम केवळ उच्च दर्जाचे नाही तर त्यांची घडण देखील अतुलनीय आहे. येथील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची व्यवस्था अशी आहे की, विमानतळांवरील स्वच्छतेची व्यवस्थाही कमी वाटेल. इतकेच नाही तर अशा अनेक व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत की, ज्या इतरत्र दुर्मिळ आहेत. तृतीयपंथीयांसाठी येथे स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे. बाळांना स्तनपान एकांत मिळावा यासाठी येथे विशेष कक्ष आहे. अशा प्रकारची व्यवस्था कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मिळणे प्रायः कठीण असते.
आलिशान वॉश बेसिन, स्वयंचलित ड्रायर, मोकळ्या जागी सुंदर हिरवळ अशी येथील सर्व रचना आहे. प्रसाधनगृहांचा वापर करून जे परत येतात त्यांच्याकडून या व्यवस्थेचे जे कौतुक केले जाते ते कौतुक ऐकून गरजूंपेक्षा जास्त दर्शनार्थी तेथे येऊ लागले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, मंदिराची व्यवस्था आणि स्वच्छता लोकांसमोर एक उदाहरण म्हणून मांडण्याचा प्रयत्न आहे.