बदलापूर, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका प्रख्यात सह-शिक्षण शाळेतील दोन नर्सरी-वयाच्या मुलींवर 23 वर्षीय पुरुष सफाई कर्मचारी सदस्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 12-13 ऑगस्ट 2024 दरम्यान घडलेली ही घटना उघडकीस आली. यातील एका पीडित मुलीने तिच्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले यावेळी हि घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. “बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार” अशी प्रतिक्रिया भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.
चित्र चित्रा म्हणाल्या, “बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…, बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते.
या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार…
या घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रस्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलने सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते ‘अलर्ट मोड’वर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सुचना ही दिल्याहेत
या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत
समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावे, अशी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे.” असे त्या म्हणाल्या.
- शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका
- हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन
- …असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)
- आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी