मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी हिंदू समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “हिंदूंनो सावध व्हा, वोट जिहादची (Vote Jihad) अजान झाली आहे,” असे ट्विट करत त्यांनी सोशल मीडियावर मतप्रदर्शन केले. त्यांनी सोबत एक व्हिडीओही शेअर केला, ज्यामध्ये एक मौलवी मुसलमानांना आवाहन करताना म्हणतो की, जे शिंदे-फडणवीस-अजित पवार आणि महायुतीसोबत आहेत, ते इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्याशी प्रामाणिक नाहीत आणि त्यांचा निषेध केला पाहिजे, असे मौलवी व्हिडीओमध्ये बोलत आहे.
राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ‘व्होट जिहाद’ नावाची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. अतुल भातखळकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मौलवी स्पष्टपणे सांगतो की, जो कोणी शिंदे-फडणवीस-अजित पवार आणि महायुतीसोबत आहे, ही महायुती संतांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे, त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे जे मुसलमान महायुती सोबत आहे, ते यांचे वफादार आहेत, ते इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्याशी प्रामाणिक नाहीयेत. शिंदे सरकारसोबत जे मुसलमान उभे आहेत, आम्ही त्यांचा निषेध करतो, असे त्याने म्हटले आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी सर्व हिंदूंना सावध होण्याचे आवाहन करत “वोट जिहादची अजान झाली आहे” असे विधान केले. त्याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी ‘व्होट जिहाद’ ही घोषणा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सोलापूर, मुंबई उत्तर-मध्य आणि अमरावती यांसारख्या मतदारसंघांत याचा परिणाम दिसून आला होता. मुसलमान मौलवींनी भाजपाविरोधी मतदानाचे आवाहन केले होते, ज्यामध्ये सोलापूरमधील मशिदींमधून फतवे जारी करण्यात आले होते.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसलमान मौलवींच्या सभा झाल्या ज्यात भाजपाविरोधी मतदान करण्याचे आवाहन केले गेले. परंतु महाराष्ट्रात या सर्वांची सुरुवात झाली ती म्हणजे सोलपुरातल्या मशिदीतून निघालेल्या फतव्यापासून .मशिदीतून घोषणा होत होत्या, केवळ मुसलमानांना समजेल अशा उर्दू भाषेत ज्यांचा प्रचार होत होता. सोलापूरमधील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात फतवा निघाला तेव्हा ते म्हणाले, “काँग्रेसची मानसिकता ही ‘जिहादी’ लोकांना सोबत घेण्याची राहिली आहे. एमआयएमने उमेदवार न दिल्याने मशिदींमधून फतवे निघत आहेत. या फतव्याच्या विरोधात सर्व हिंदू समाज एकत्र होईल आणि नरेंद्र मोदी यांच्या मागे राहील,” असे राम सातपुते यांनी त्यावेळी म्हटले होते.