Saturday, October 12, 2024

मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय

Share

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, अशी टीका भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलीये. नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, “मविआतील तिन्ही पक्षांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न दिवसा पडू लागली आहेत. महाराष्ट्रातील नागरिक-मतदार हे पाहतोय. महाराष्ट्राच्या हिताबाबत, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल, महाराष्ट्राच्या भल्याबद्दल यांना चिंता नसून मुख्यमंत्रिपदाचा हव्यास लागला आहे. मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे,” असं टीका आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका २०२४ होणार आहेत. निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासूनच सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे असं दिसतंय. राज्यातील अनेक दिग्गजांचा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर डोळा आहे. विधानसभेच्या निकालानंतर सत्ता समीकरण कुणाकडे झुकते. जनता कुणाला कौल देते आणि राजकीय गोळाबेरजेनंतर कोण मुख्यमंत्री होतो हे काळाच्या उदरातून बाहेर येईलच. पण तोपर्यंत कार्यकर्ते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून व्यक्त होत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख