Monday, December 15, 2025

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

Share

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार

बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूकांसाठी अर्ज भरायची तारीख २३ ते ३० डिसेंबर २०२५. अर्ज पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे.

मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान करणे गरजेचे आहे. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार थांबवला जाईल. या सर्व काळात निवडणूक निर्णय अधिकारी २७० अधिकारी आणि १,९६,६०५ कर्मचारी काम करतील.

२९ महानगरपालिकामध्ये एकूण जागा – २,८६९, महिला १,४४२, अ.जा – ३४१, अ.जमाती- ७७ इतक्या जागांसाठी मतदान होणार आहे.

शहरजागाशहरजागा
बृहन्मुंबई227उल्हासनगर78
भिवंडी-निजामपूर90चंद्रपूर66
नागपूर151धुळे74
पुणे162जळगाव75
ठाणे131मालेगाव84
अहमदनगर68कोल्हापूर92
नाशिक122सांगली-मिरज-कुपवाड78
पिंपरी-चिंचवड128सोलापूर113
औरंगाबाद113इचलकरंजी76
वसई-विरार115जालना65
कल्याण-डोंबिवली122पनवेल78
नवी मुंबई111परभणी65
अकोला80लातूर70
अमरावती87नांदेड-वाघाळा81
मीरा-भाईंदर96

अन्य लेख

संबंधित लेख