केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लस वरून ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले. त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली.
काही दिवसांपूर्वीच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे एएसएल सुरक्षा मोहन भागवत यांना दिली गेली आहे.
मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाईन केलेल्या हेलिकॉप्टरमध्येच परवानगी दिली जाईल.
सुरक्षेबाबत वाढत्या चिंता आणि विविध एजन्सींच्या इनपुटनंतर, गृह मंत्रालयाने भागवत यांना ASL सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला. वाढीव सुरक्षेबाबत माहिती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली आहे.
- ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ४
- सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन
- देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे
- नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन
- राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान