Wednesday, November 13, 2024

विरोधी पक्ष पराभवाच्या मानसिकतेत; म्हणून रोज सरड्यासारखे रंग बदलत आहेत

Share

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतगणना होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र भाजपचे देशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांचा समाचार घेतला आहे. “विरोधी पक्ष पराभूत मानसिकतेत आहेत. त्यामुळे रोज ते सरड्यासारखे रंग बदलत आहेत.” अशी टीका त्यांनी त्यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेहमीच सरड्यासारखे आपले रंग बदलतात. लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा निवडणूक आयोगावर टीका केली. आता निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या तर ते विरोधकांच्या जीवावर आले आहे. त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळेच अशा प्रकारच्या टीका करत आहेत. विरोधकांना पराभव स्वीकारायचा नसल्यामुळे ते सतत मुद्दे बदलत आहेत. त्यांचा पराभव ठरलेला आहे. काही दिवसांत ते ईव्हीएम मशीन किंवा निवडणूक आयोगावर आरोप करतील. मात्र, आम्ही जनतेसमोर विकासकामांचे भांडार घेऊन जाणार आहोत, आणि त्यावरून जनतेचा पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख