Saturday, May 25, 2024

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे

Share

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज मतदान होणाऱ्या अकरा ही जागा महायुती जिंकेल”, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर त्यांनी टीकास्त्र डागले, बावनकुळे म्हणाले की, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) पराभूत होणार आहे. पवारांनी महातिकास आघाडीचा तयार केलेला फुगा चार तारखेनंतर फुटणार असून मविआचे तुकडे तुकडे होणार आहे. राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी दोन पक्ष आता चार तारखेला राज्यात दिसणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळ,, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केलेल्‌या आरोपावर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना निशाण्यावर घेतले. जेव्हा पराभव होतो, पराभवाचे लक्षणं दिसतात, तेंव्हा असे वक्तव्य करणे नॉर्मल आहे. हे ते बोलतच राहणार, पराभव जसा जवळ दिसेल, ईव्हीएम खराब आहे. मशीन खराब झाली आहे. मशीनमध्ये दोष आहे, असे आरोप ते करतील. परसेंटेजचा दोष सांगतात. निवडणूक निर्णय अधिकारी शेवटपर्यंत सांगत नाही. यांना आता पराभव दिसत असल्‌याने असे लक्षण दिसत आहे, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख